Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष  

संतोषभाई कोळी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव  

आमदार अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा पिगोंडे  येथे जल्लोष  

राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव  

नागोठणे | महेश पवार
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या विधान परिषदेतील कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजपा व शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार अनिकेतभाई तटकरे बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार अनिकेतभाई तटकरे कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर दुसऱ्यांचा निवडून आल्याने नागोठणे विभागातील पिगोंडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा जल्लोष साजरा केला. 
दमदार आमदार अनिकेतभाई तटकरे यांची विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ मतदार संघात सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे समजताच नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत – आंबेघर येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच उपस्थित सर्वांना पेढे वाटून आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. युवकांचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे आपले हक्काचे दमदार आमदार अनिकेतभाई तटकरे दुसऱ्यांदा निवडून आल्याने यावेळी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विजयाच्या आणि महायुतीच्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
वेलशेत – आंबेघर येथील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या या विजयी जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांच्यासह कार्यकर्ते विजय पारंगे,  रोशन पारंगे, अनिल पाटील, पुंडलिक ताडकर, गंगाराम पारंगे, धनाजी पारंगे, अंकुश ताडकर, प्रमोद चोरगे, सम्राट ताडकर, प्रथमेश दिवकर, प्रशांत पारंगे, जितेंद्र पारंगे, निलेश मळेकर, अनुराग ताडकर, अमर ताडकर, प्रतिक पारंगे, विघ्नेश ताडकर आदींसह  ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!