E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़शिक्षण

विनोदशेठ धामणे यांनी वाढदिवशी जोपासला कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा 

कोंडगाव व आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  

विनोदशेठ धामणे यांनी वाढदिवशी जोपासला कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा 

कोंडगाव व आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  
नागोठणे | महेश पवार
नागोठणे विभागातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावलौकिक असलेल्या  नागोठण्याजवळील कोंडगाव येथील धामणे कुटुंबियांच्या आणि आपले दिवंगत आजोबा सजनाजी धामणे यांच्या समाजसेवेचा वारसा जतन करून तो पुढे नेण्याचे काम महावितरणचे अधिकृत शासकीय परवानाधारक कंत्राटदार असलेले धामणे इलेक्ट्रिकलचे मालक आणि युवा उद्योजक विनोदशेठ विजय धामणे यांच्याकडून सुरू आहे. याच समाजसेवेचा एक भाग म्हणून विनोदशेठ धामणे यांनी २२ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोंडगाव व लगतच्या आदिवासी वाड्यांमधील प्राथमिक व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करून आपल्या धामणे कुटुंबियांचा सामाजिक वारसा पुढे सुरू ठेवल्याने विनोदशेठ  धामणे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. 
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या शिवराज मित्रमंडळ, कोंडगाव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. युवा उद्योजक कु. विनोदशेठ धामणे यांच्या वाढदिवसा निमित्त कोंडगावसह, कातळावाडी, तळईवाडी आणि पायरवाडी येथील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर, पाणी बाटली, वह्या, कंपास पेटी, पेन, पेन्सिल अशा शालेय उपयोगी साहित्याचे वाटप २२ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले.
आदिवासी वाड्यांवर झालेल्या कार्यक्रमाला विनोदशेठ धामणे यांच्यासह युवा नेते हरिश धामणे, शिवसेना कोंडागाव शाखेचे  उप शाखा प्रमुख नितेश धाडसे, आदेश ठोंबरे, राम उघडा, दुर्गाजी बांगारे, संदेश धामणे, ओमकार धामणे, गौरव धाडसे, रोहित धामणे, समाधान राजीवले, शंतनु धामणे, रुद्र शिर्के आदी उपस्थित होते. तर कोंडगाव शाळेत व अंगणवाडीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाला विद्या धामणे, कल्पना धामणे, निर्मला शिर्के, सोनिया धामणे, उज्वला धामणे, श्रद्धा धामणे, सपना धामणे, सानिका खोपरे, शितल विचारे, लक्ष्मीबाई धामणे, गुलाब धामणे, कोंडगाव प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष दीपिका बुरूमकर, उपाध्यक्ष सुहास मालुसरे, मुख्याध्यापिका सुषमा भटकर, अंगणवाडी शिक्षिका रसिका धामणे, मदतनीस ममता वाघ आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!