E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यकलाक्रीडामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

विद्यार्थ्यांसाठी नियमित योग सत्र

एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नियमित योग सत्र

नागोठणे | महेश पवार
एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर आठवड्याला नियमित योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. 
या योग सत्राचे मार्गदर्शन एस.एस.ओ. जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथील अनुभवी योग प्रशिक्षकांकडून करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम, ध्यान तसेच सूर्यनमस्काराचा सराव केला. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहण्यास, मानसिक तणाव कमी होण्यास, एकाग्रता वाढण्यास व निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन यांनी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  प्रवेश यादव, कॉम्प्युटर विभागप्रमुख सागर सुरेकर, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख ज्योती पालवे, मेकॅनिकल विभागप्रमुख विशाल पाटील, एआयएमएल विभागप्रमुख स्पृहा तांडेल, प्रथम वर्ष विभागप्रमुख नीलम पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रमांसोबतच आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, नियमित योग सत्र हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग असल्याचे कॉलेज व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!