E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

होली एंजल्स स्कूलचा निकाल १०० टक्के

पहिल्या तीन क्रमांकावर मुलींचे वर्चस्व 

नागोठण्यातील होली एंजल्स स्कूलचा निकाल १०० टक्के

पहिल्या तीन क्रमांकावर मुलींचे वर्चस्व 
नागोठणे | महेश पवार 
नागोठण्यातील नीव सोशियल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या होली एंजल स्कूलचे सर्व ६६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल सलग ११ व्या वर्षी १०० टक्के लागल्याने शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे.  होली एंजल्स स्कूल मध्ये कु. हर्षदा राजेश शिरसे ही विद्यार्थिनी ९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली  आहे. तर कुमारी सिद्धी संजय भोईर (८९.८० टक्के) व कुमारी शाल्मली प्रमोद जवके (८८.२० टक्के) या दोन विद्यार्थिनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन विजय मुल्कवाड, सीईओ रूधीरा मुल्कवाड, ट्रेझरर रेचल मुल्कवाड, हेड मिस्ट्रेस नीलिमा राणे, उपमुख्याध्यापक मुकेश मिसळ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!