Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

रायगडच्या चार विद्यार्थ्यांची थेट इस्रोवारी !

भाजपाचे अशोक अहिरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांची मोठी झेप

रायगडच्या चार विद्यार्थ्यांची थेट इस्रोवारी !

भाजपाचे अशोक अहिरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांची मोठी झेप
३६१७ विद्यार्थ्यांमधून रायगडच्या चार विद्यार्थ्यांचे  घवघवीत यश !
रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक डंका राज्यभर
नागोठणे | महेश पवार
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले असून जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांची थेट इस्रो भेटीसाठी निवड झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप रोहा तालुका शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांनी ही मोठी झेप घेतली आहे. एकूण ३६१७ विद्यार्थ्यांमधून रायगडच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविल्याने रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक डंका राज्यभर झाला आहे. 
इस्रो भेटीसाठी कु. सार्थक सुहास माने, इयत्ता ७ वी, सीकेटी इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू पनवेल,  कु. विनीत विनोद कापसे, इयत्ता ८ वी, द. ग. तटकरे उच्च माध्यमिक विद्यालय, कोलाड.,  कु. साई योगेश म्हात्रे, इयत्ता ७ वी, रा.जि.प शाळा पिगोंडे – नागोठणे,  कु. शुब्रा सुधीर शिंदे,  ग. बा. वडेर हायस्कूल, पाली या चार विद्यार्थ्यांची रायगड जिल्ह्यातून निवड झाली आहे. 
अशोक अहिरे यांची २ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुकुल एज्युकेशन सोसायटीकडून जिल्हास्तरीय प्रमुख पदावर निवड करण्यात आली होती. ही निवड भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख सतीश धारप यांच्या प्रेरणेने तसेच खासदार धैर्यशिलदादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे व शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व रजिपचे शिक्षण व आरोग्य सभापती वैकुंठशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.
गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी २०११ पासून स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा अशोक अहिरे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. यासाठी पोलादपूर, कर्जत, खोपोली, उरण, खारघर ते पनवेलपर्यंत सातत्याने दौरे करून शिक्षक व पालकांमध्ये स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. परिणामी, संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तब्बल ३६१७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या यशस्वी उपक्रमासाठी ज्ञानकूर स्कूलचे चेअरमन रवि लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बावदाने आणि भाजप नागोठणे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के यांनीही अहोरात्र मेहनत घेतली. २५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या स्पर्धा परीक्षेत रायगड जिल्ह्यातून प्रथमच चार विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर विशेष यश मिळवत इस्रो भेटीसाठी निवड मिळवली आहे.
निवड झालेले हे चारही विद्यार्थी ४ जून २०२६ रोजी इस्रोच्या शैक्षणिक सहलीसाठी रवाना होणार असून राज्यातील मेरिट यादीत एकूण ६२ विद्यार्थ्यांमध्ये रायगडचे ४ विद्यार्थी स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भावना व्यक्त होत असून चारही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!