Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यकलामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नागोठण्यातील योग गुरुकुल क्लासमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

योग गुरू यामिनी दिघे यांनी केले मार्गदर्शन 
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील योगा प्रशिक्षणामध्ये नावाजलेल्या अशा योग गुरुकुल क्लासमध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव बुधवार दिनांक २९ जुलै रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या योगगुरू यामिनी दिघे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. गुरुंच्या प्रेरणेने नियमित योगाभ्यास, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प सर्वांनी केला.
या प्रसंगी योग गुरुकुल क्लासच्या संस्थापिका व योगप्रशिक्षिका यामिनी सुशील दिघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो. योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवन घडवणे हेच योग गुरुकुलचे मुख्य व अंतिम ध्येय आहे आहे असे बहुमोल मार्गदर्शन योग गुरू यामिनी दिघे यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!