Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआंदोलनकामगार क्षेत्रमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

रिलायन्स कामगारांच्या नेहमी पाठीशी राहणार

भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या रिलायन्स युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर 

नागोठणे रिलायन्स मधील कामगारांच्या नेहमीच पाठीशी राहणार : आ. महेंद्रशेठ दळवी 

भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या रिलायन्स युनिटची नवीन कार्यकारिणी जाहीर 
अध्यक्षपदी किशोर शिर्के, कार्याध्यक्षपदी पंडित तुपकर व सरचिटणीस पदी चंद्रकांत अडसुळे यांची निवड 
अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे व सरचिटणीस जिम्मी डे यांची उपस्थिती
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी दिल्या नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा !
नागोठणे | महेश पवार
कामगार क्षेत्रापासून इथपर्यंत प्रवास केलेला मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे. आपण सर्वजण सामाजिक जीवनात वावरत असताना राजकारण करीत असतो. कामगार युनियन चालविणे  हे काही सोपे काम नाही. कितीही चांगला पगार वाढीचा करार केला तरी कामगारांमध्ये समाधान नसते.  मात्र काळानुरूप आपण बदलले पाहिजे. रिलायन्सचा मोठा प्रकल्पना नागोठण्यात उभारला जात आहे. अंबानींजवळ माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल गैर बोलणे योग्य नाही. तसेच नवीन प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र रिलायन्सचा वाढता विस्तार पाहता स्थानिकांना जास्तीत जास्त कसा रोजगार मिळेल ही आमची भूमिका असेल. त्यामुळे नागोठणे रिलायन्स मधील कामगारांच्या नेहमीच पाठीशी राहणार असल्याचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी स्पष्ट करीत त्यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांना चांगले काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये कार्यरत असलेल्या व रिलायन्स कंपनीतील बहुतांश कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व गेल्या पाच वर्षापासून करीत असलेल्या भारतीय श्रमिक शक्ती संघ या कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष संजय काकडे व अन्य चार कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने संघटनेची नवीन कार्यकारिणी भारतीय श्रमिक सक्ती संघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, केंद्रीय कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे व केंद्रीय सरचिटणीस जिम्मी डे यांच्या सूचनेनुसार राजमाला (ता. अलिबाग) येथे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यालयात व  त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय श्रमिक शक्ती संघाचे कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे यांच्याकडून बुधवारी (दि.२७) सकाळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. 
(भारतीय श्रमिक शक्ती संघाला केलेल्या सहकार्याबद्दल आ. महेंद्रशेठ दळवी यांचा सत्कार करतांना  युनियन अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे व सरचिटणीस जिम्मी डे)
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये दिनांक १ जून, २०२६  पासून ही नवीन कार्यकारणी कार्यरत होणार आहे.  या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी किशोर शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.  कार्याध्यक्ष पंडित तुपकर, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज पेढवी व दिनेश शिर्के, उपाध्यक्ष अजित घरत, विनोद गोरे व राजकुमार राजभर, सरचिटणीस चंद्रकांत अडसुळे, सचिव यशवंत डाकी व प्रकाश तेरडे, सहसचिव संजय शिर्के, विठोबा कुथे, नरेश म्हात्रे, इस्माईल पिट्टू, खजिनदार असलम चोगले, कार्यकारिणी सदस्य अनिल जांबेकर, दीपक पाटील, राजेश जवके, सिताराम वारगे, सुभाष म्हात्रे व गणेश जाधव, सल्लागार सुभाष खराडे व मारुती दांडेकर तर कायदेशीर सल्लागार ॲड. महेश पवार यांचा या नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या केंद्रीय कार्यकारिणी मध्ये संघटक सचिव संजय काकडे संघटक सहसचिव प्रमोद मोरे व कार्यकारणी सदस्य म्हणून गणपत खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय श्रमिक शक्ती संघाचे रिलायन्सच्या नागोठणे युनिट अध्यक्ष संजय काकडे, सुधीर पारंगे, अजीम बेणसेकर, सुभाष ताडकर व महादू लाडगे या ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय श्रमिक शक्ती  संघाचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. नितीन शिवकर, केंद्रीय कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे व केंद्रीय सरचिटणीस जिम्मी डे, शिवसेना रायगड जिल्हा महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, पेणच्या नगरसेविका सुजाता डाकी, नगरसेवक भूषण कडू, भारती सिंगासने, अशोक भोय, प्रकाश मोरे, मोहन भोय, विनोद गोरे आदींसह भारतीय श्रमिक शक्ती संघाच्या रिलायन्स युनिट मधील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय श्रमिक शक्ती संघाचे कार्याध्यक्ष दीपकभाई रानवडे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, रिलायन्स कंपनीत सेवेत असलेला कामगारांपैकी ७० टक्के कामगार हे भारतीय श्रमिक शक्ती संघाचे आहेत. कामगार क्षेत्र हे खूप चांगले आहे मात्र आपल्यात काहीजण कड्या करतात त्यांच्या काड्या आपल्याला ओळखून त्यांच्या नाड्या आपल्याला  आवळता आल्या पाहिजे. भविष्यात अधिक चांगली झेप घेण्यासाठी नवीन लोकांच्या हाती काम सोपविले असून टीमवर्क करून सर्वांची कामे करा. आंदोलने करतानाच काही ठिकाणी योग्य वेळ पाहून तडजोड करणेही गरजेचे असते. नवीन पदाधिकाऱ्यांनी संघटना हे कुटुंब आहे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी भविष्यात पार पाडावी असे बहुमोल मार्गदर्शन यावेळी दीपकभाई रानवडे यांनी केले.
यावेळी रिलायन्स मधील निवृत्त महिला कर्मचारी  भारतीताई सिंगासने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय श्रमिक शक्ती संघाचे रिलायन्स नागोठणे यूनिटचे सरचिटणीस चंद्रकांत अडसुळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!