E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gif

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

इस्रोला भेट देऊन आलेल्या कु. साई म्हात्रे याचा सत्कार

शिवसेना पिगोंडे शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इस्रोला भेट देऊन आलेल्या कु. साई म्हात्रे याचा सत्कार
नागोठणे | महेश पवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाखा पिगोंडे, आंबेघर, वेलशेत तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगड जिल्हा परिषद शाळा पिगोंडे येथे १४ जुलै, रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमात १ ली ते ७ वी या वर्गातील ४९ विद्यार्थ्यांना वह्या, पेन, रजिस्टर या शैक्षणिक साहित्याचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. याशिवाय इयत्ता दहावीमध्ये पहिल्या ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इस्रो भेटीसाठी निवड होऊन इस्रोमध्ये जाऊन आलेला राजिप पिगोंडे शाळेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थी कु. साई योगेश म्हात्रे या विद्यार्थ्याचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे हे ३९ वे वर्ष होते.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पोलिस उपनिरीक्षक रमेश सोनकर यांनी आईवडिलांचा, शिक्षकांचा आदर करा आणि ते सांगतील तसे वागा, तसे केल्यास तुम्ही नक्कीच मोठे व्हाल असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रवादीचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांनी विद्यार्थी संख्या घटली तर शाळा बंद पडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फावेल म्हणून शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी जनजागृतीची गरज व्यक्त करून जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही कमी नसल्याचे सांगितले. यावेळी बळीराम बडे, दिनेश घाग यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक रमेश सोनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, पिगोंडे ग्रामपंचायतीचे प्रशासक संदीप कुलम, ग्रामसेवक कृष्णा लांगी , उबाठा शिवसेना उपविभाग प्रमुख बळीराम बडे, पिगोंडे शाखा प्रमुख गंगाराम मिणमिने, वेलशेत उप शाखा सुभाष मढवी, पिगोंडेचे माजी उपसरपंच सखाराम घासे, माजी उपसरपंच रंजना माळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष विठोबा माळी, शिवसेनेचे विभागीय संघटक दिनेश घाग, प्रकाश मोरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीमती दया पाटील, कृष्णा म्हात्रे, हे. कॉ. अथर्व पाटील,
केंद्र प्रमुख पंकज पवार, पिगोंडे शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर लेंडी, शिक्षिका सोनल पाटील, पुंडलिक ताडकर, मोहन बडे, गणपत घासे, लक्ष्मण घासे, राजेंद्र बडे, जयेश बावकर, दिनेश भोईर, मधुकर घासे, दिनेश बावकर आदींसह सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच आंबेघर, वेलशेत गावातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन यांनीही शुभेच्छा कळविल्या. या कार्यक्रमाचे सुंदर असे  संपूर्ण सूत्रसंचालन शिक्षिका सोनल पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!