E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

नंदकुमार म्हात्रे यांची पाचव्यांदा निवड

नंदकुमार म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव 

(श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा निवड झाल्याबद्दल नंदकुमार म्हात्रे यांचे अभिनंदन करतांना तिसे येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत खराडे व इतर)

श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नंदकुमार म्हात्रे यांची पाचव्यांदा निवड

नंदकुमार म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !
नागोठणे | महेश पवार
रोहा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था असलेले सानेगाव (ता. रोहा) येथील श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंतखार (ता. रोहा) येथील श्री नंदकुमार म्हात्रे यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेची सभासदांची  वार्षिक सर्वसाधारण सभा साने गुरुजी विद्यानिकेतन, सानेगाव–यशवंतखार येथे २६ मे रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली त्यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या सभेला संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाची कार्यकारिणी दर पाच वर्षांनी बदलण्यात येते. यावर्षी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये सुडकोळी येथील बाळू पाटील यांची उपाध्यक्षपदी, यशवंतखार येथील मोहन ठाकूर यांची खजिनदारपदी, सानेगाव येथील मनोहर मोरे यांची सचिवपदी तर ॲड. विवेक मोरे यांची सल्लागारपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे व इतर सर्व पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळ, सानेगाव या शैक्षणिक संस्थेच्या रोहा तालुक्यात सानेगाव, सुडकोळी, चोरडे, आरे (बु.) व तिसे या पाच ठिकाणी हायस्कूल असून यामध्ये दहावीपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यात येते. आजपर्यंत या संस्थेच्या हायकुल मधून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले गेले असून आज हे विद्यार्थी चांगल्या खासगी व सरकारी नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी  व्यवसायामध्ये आपला नावलौकिक मिळविला आहे. यापुढेही आपल्या संस्थेच्या सर्व शाळांमधून सर्वोत्तम व दर्जेदार शैक्षणिक सुविधा देऊन गुणवंत विद्यार्थी घडविले जातील अशी प्रतिक्रिया श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.
(श्री दिनाभाई मोरे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांचे अभिनंदन करतांना परशुराम मोकल, संजय म्हात्रे व अन्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!