Uncategorized

ॲड. तपन थत्ते यांचे मार्गदर्शन 

गुरुपौर्णिमेनिमित्त रोहा न्यायालयात रिमांड अँड प्री-चार्जशीट बेल विषयावर ॲड. तपन थत्ते यांचे बहुमोल मार्गदर्शन 

नागोठणे | महेश पवार
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असतानाच रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद रोहा यांचे तर्फे आणि रोहा बार असोसिएशनच्या सहकार्याने रिमांड अँड प्री-चार्जशीट बेल या विषयावर मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता तपन अनंत थत्ते यांचे व्याख्यान आयोजित 
करण्यात आले होते. अधिवक्ता तपन थत्ते यांनी जामीन अर्ज कसा व कधी द्यावा, अटक व्यक्तीचे अधिकार, जामीन मिळण्यास आरोपी कधी पात्र ठरतो आदी अनेक मुद्द्यांवर वरिष्ठ न्यायालयाच्या न्याय निर्णयांचा दाखला देऊन सखोल असे मार्गदर्शन यावेळी केले.
न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. खैरे, अधिवक्ता परिषदेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ॲड. धनंजय धारप, रोहा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सुनिल सानप, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. योगेश तेंडुलकर, अधिवक्ता परिषद रायगड जिल्हा संघटन सचिव ॲड. स्वराज मोरे, पाली बार असोसिएशनच्या अध्यक्ष ॲड. अक्षरा देशमुख यांच्या विशेष उपस्थितीसह स्थानिक रोहा बारचे पदाधिकारी, सीनियर वकील, तसेच पाली वकील संघटनेचे व माणगाव वकील संघटनेचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
अधिवक्ता परिषदेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ॲड. धनंजय धारप व सर्व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आर. बी. सावंत यांची रोहा तालुका अधिवक्ता परिषद पालक म्हणून निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.  या कार्यक्रमाचे वक्ता ॲड. तपन थत्ते यांचा परिचय ॲड. सुरेखा चव्हाण यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शीतल सानप यांनी, सूत्रसंचालन ॲड. दिव्या सावंत यांनी तर आभार प्रदर्शन ॲड. प्रतिक पाटणकर यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!