Uncategorized

प्रभाकर तांडेल यांच्या खांद्यावर 

नागोठणे शहरातील समस्यांवर भर देण्याचे सुतोवाच  

मनसे नागोठणे शहराध्यक्षाची धुरा प्रभाकर (प्रभू)  तांडेल यांच्या खांद्यावर 

नागोठणे शहरातील समस्यांवर भर देण्याचे सुतोवाच  
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नागोठणे शहराची धुरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नागोठणे शहरातील तरुण, तडफदार नेतृत्व आणि होतकरू तरुण प्रभाकर किसन तांडेल उर्फ प्रभुशेठ यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रभाकर तांडेल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
नागोठणे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक नागरी समस्या सोडविण्यावर भर देण्याचे सुतोवाच मनसेचे नवनिर्वाचित नागोठणे शहर अध्यक्ष प्रभाकर तांडेल यांनी नियुक्तीनंतर केले आहेत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विश्वासाला तडा न देता त्यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शहरातील पिण्याचे पाणी, पूरनियंत्रण व इतर महत्वाच्या प्रश्नांबरोबरच स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रभाकर तांडेल यांनी नियुक्तीनंतर सांगितले. तसेच, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संघटनात्मक विस्तारावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असेही प्रभाकर तांडेल यांनी स्पष्ट केले आहे. 
दरम्यान प्रभाकर तांडेल यांच्या या नियुक्तीमुळे नागोठण्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, मनसे पक्ष नागोठण्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका बजावेल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभाकर तांडेल यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम इत्यादी आपण सर्वांनी वेळोवेळी आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने राबवावी व यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्विकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्यावी. आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही अशा प्रकारचे आपले वर्तन असेल हिच अपेक्षा ! आपली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून आपल्या पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल. तसेच मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल असा प्रकारचे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व आपणा सर्वांना पुढील कार्यवृद्धीसाठी शुभेच्छा देतो ! असेही या पत्रात म्हटले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!