E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागोठणे | महेश पवार
पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस.एस.ओ.एस.पी. डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालय, नागोठणे येथे दिनांक १७ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे सीईओ कार्तिक जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.विद्यार्थ्यांनी स्वतः वृक्ष लागवड करून पर्यावरणाबाबत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवेश यादव तसेच कंप्युटर विभागप्रमुख सागर सुरेकर , इलेक्ट्रिकल  विभागप्रमुख ज्योती पालवे, मेकॅनिकल विभागप्रमुख विशाल पाटील, एआयएमएल विभागप्रमुख स्पृहा तांडेल, वैभव नांदगावकर, प्रथम वर्ष विभाग प्रमुख नीलम पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांमध्ये नियमित सहभाग घेण्याचे आवाहन केले.  या कार्यक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक किशोर जैन यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे अभिनंदन केले तसेच पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!