E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवारक्तदान शिबिरराज्यलोकल न्यूज़

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

४९ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

डॉ. पुरुषोत्तम भोईर क्लिनिक मध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

४९ रक्तदात्यांनी केले रक्तदान 
नागोठणे | महेश पवार
शिहू येथील डॉ. पुरुषोत्तम भोईर यांच्या विशेष प्रयत्नाने सालाबादप्रमाणे यावर्षीही दि. १९ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रायगड मेडिकल असोसिएशन व रोहा तालुका मेडिकल असोसिएशन आणि परमार्थ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. 
या रक्तदान शिबिरा मधील ब्लड कलेक्टर करण्यासाठी रक्तपेढी अलिबाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  शिबिराचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाददादा भोईर व रा. जि. प. विद्यमान सदस्या सौ. पल्लवीताई प्रसाद भोईर, डॉ. रोहिदास शेळके, आर. एम. ए. माजी अध्यक्ष, डॉ. सचिन नाईक, आर एम ए चे विद्यमान अध्यक्ष डॉ. आशिर्वाद मोकल, सेक्रेटरी, डॉ. अमित पाटील, ट्रेझरर, डॉ. योगेश भोनकर डॉ. अंकीत भोईर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. निखिल गरूडे, डॉ. कल्पेश पाटील, कामगार नेते लक्ष्मण खाडे, दिपक पाटील, निवृत्त विस्तार अधिकारी के. के. कुथे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शिहू विभागातील तरूण वर्गाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही रक्तदान शिबिराला उत्सफुर्त प्रतिसाद देवून एकूण ४९ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम भोईर, डॉ. प्रिया भोईर यांच्या निमंत्रणाला मान देऊन विभागातील अनेक मान्यवर व रोहा तालुक्यातील, नागोठणे विभागातील डॉक्टर्स यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
उपस्थित सर्वांनी डॉ पुरुषोत्तम भोईर यांचे भरभरून कौतुक केले. विशेषतः प्रसाददादा भोईर यांनी युद्धा खुप कौतुक केले. हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी दामोदर भोईर, चेतन पोवळे, विशाल दिवेकर, विजय पाटील, परमार्थ ग्रुप यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!