Uncategorized

शिष्यवृत्ती परीक्षेत यश

एस डी परमार स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश 

नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल २५ जुलै २०२६ रोजी जाहीर केला आहे. यामध्ये नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या वेलशेत येथील विद्यासंकुलातील एस डी परमार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. 
शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु. मानव पाठक – इयत्ता ४ थी, कु. अनुप कावडे व कुमारी रिझना मुल्ला – इयत्ता ५ वी तसेच इयत्ता ७ वी मधील कुमारी श्रेया दांडेकर, कुमारी पलक दापके व कु. पियुष यादव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे भाएसोचे अध्यक्ष किशोरशेठ जैन, शाळा समिती चेअरमन सुरेश जैन,  मुख्याध्यापिका अमृता गायकवाड व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!