Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यात २५ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन

सुप्रसिद्ध भीम क्रांतीचा एल्गार कार्यक्रमाचे आयोजन

नागोठण्यात २५ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन

सुप्रसिद्ध भीम क्रांतीचा एल्गार कार्यक्रमाचे आयोजन
नागोठणे  | महेश पवार
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्‍वभूषण, सिम्बॉल ऑफ नॉलेज,  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवाचे  आयोजन शनिवार दि.२५ एप्रिल रोजी नागोठणे एस.टी.बस्थानक लगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे बौध्दजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्र. ३ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेतकर यांच्या या जयंती निमित्ताने सकाळी ९ वाजता होणा-या पंचशिल ध्वजारोहन व बुद्ध पुजापाठ कार्यक्रमाने या जयंती सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता तथागत  भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणुक नागोठणे शहरांतुन निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता बौध्दजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्र. ३ चे अध्यक्ष एस.एन. गायकवाड भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली समाज प्रबोधनपर जाहीर सभेचे आयोजन कार्यक्रम स्थळी करण्यात आले आहे. या सभेला मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नगरसेवक परिषद मुंबई चे अध्यक्ष राम भारत जगदाळे, भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, अध्यक्ष किशोरभाई जैन, राजिपचे सदस्य सुमितदादा काते, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, रोहा पंचायत समितीच्या सदस्य समृद्धीताई कोळी, अरुणाताई हंबीर, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सभेनंतर रात्री दहा वाजता व्ही. जे. म्युझिक ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत सुप्रसिद्ध भीम क्रांतीचा एल्गार हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती सोहळा यशस्वीपणे साजरा होण्यासाठी उत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव,  स्वागताध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव दिलीप गायकवाड, सहसचिव अनंत शेलार, खजिनदार दिलीप दाभाडे, सहखजिनदार अरविंद गायकवाड आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच भीमशक्ती मित्र मंडळ व महिला मंडळ रमाईनगर नागोठणे, नालंदा बुद्ध विहार कमिटी व पंचशील महिला मंडळ वरवठणे, भीमशक्ती मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ आंबेघर, भीमशक्ती मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ पाटणसई, भिमप्रेरणा मंडळ व यशोधरा महिला मंडळ हेदवली व तामसोली आदी मेहनत घेत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!