E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
आषाढी एकादशी उत्साहात साजरी
संताच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
संताच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष
नागोठणे | महेश पवार
नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदल माऊंट लिटेरा झी स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेतील पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करून भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांच्याशी संबंधित सांस्कृतिक सादरीकरण केले, ज्यामुळे शाळेचे वातावरण भक्तीमय झाले होते.

जिंदल शाळेचे चेअरपर्सन संजीव बॅनर्जी, व्हाईस-प्रिन्सिपल श्रीमती स्वागतिका साहू, सीनियर को-ऑर्डिनेटर सुश्री सोमा बॅनर्जी, ॲडमिन हेड सूर्यकांत वर्मा आणि उपस्थित सर्व शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या पवित्र सणाचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक महत्त्व पटवून देत भारतीय संस्कृती आणि परंपरा अंगीकारण्यास प्रेरित केले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने आणि शिस्तीने सहभाग घेतला. जिंदल शाळेत आषाढी एकादशी निमित्त केलेल्या या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने सर्वांना भारतीय संस्कृती, भक्ती आणि सामाजिक मूल्यांशी जोडण्याचा संदेश दिला आणि शाळा परिसर उल्हास व श्रद्धेच्या वातावरणाने भरून गेला होता. आषाढी एकादशी निमित्त शाळेत राबविण्यात आलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमा बद्दल पालकांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले.



