E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनियुक्तीमहाराष्ट्रयुवाराजनीतिराज्य
अशफाक पानसरे यांची निवड
काँग्रेसला नागोठण्यात गतवैभव मिळवून देणार

रायगड दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी अशफाक पानसरे यांची निवड
काँग्रेसला नागोठण्यात गतवैभव मिळवून देणार : अशफाक पानसरे
नागोठणे | महेश पवार
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कल्पनेतील संघटन सृजन अभियाना अंतर्गत व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या यशस्वी नेतृत्वात व मान्यतेनुसार काँग्रेस पक्षाचे नागोठणेतील निष्ठावंत कार्यकर्ते व काँग्रेसचे विद्यमान नागोठणे शहराध्यक्ष अशफाक महामूद पानसरे यांना पक्षश्रेष्ठींनी मोठी बढती दिली आहे. अशफाक पानसरे यांची दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र अशफाक पानसरे यांना काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून नुकतेच देण्यात आले आहे. अशफाक पानसरे हे नागोठणे ग्रामपंचायतीचे दिवंगत माजी सरपंच महामूदशेठ पानसरे यांचे पुत्र आहेत.

रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळा पर्यंत पोहचवून लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे हात मजबूत कराल व प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवाल ही अपेक्षा या नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अशफाक पानसरे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष अशफाक पानसरे यांनी यापूर्वी २००७ पासून नागोठणे शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. याशिवाय सन २००३ पासून रायगड जिल्हा काँग्रेस इंडस्ट्रीयल सेल उपाध्यक्ष, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रायगड जिल्हा अल्पसंख्यक दक्षता व संनियंत्रण समिती या शासकीय कमिटीवर २०१२ ते २०१४ पर्यंत सदस्य, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रायगड जिल्हा शांतता समिती वर सन २०२२ ते २०२४ पर्यंत सदस्य तसेच विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.) अशा विविध पदाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे अशफाक पानसरे त्यांची नियुक्ती झालेल्या जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदाला ते नक्कीच न्याय देतील असे बोलले जात आहे.

काँग्रेस पक्ष हा नागोठण्यात एकेकाळी एक प्रमुख बलाढ्य पक्ष होता. याच पक्षाच्या माध्यमातून माझे दिवंगत वडील महामूदशेठ पानसरे यांनी नागोठण्याचे सरपंचपद भूषविले आहे. तसेच नागोठण्यातील दिवंगत बाबासाहेब अधिकारी हे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पातळीवरील एक दिग्गज नेते होते. या नेत्यांसह नागोठणे ग्रामपंचायतीचे दिवंगत माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, दिवंगत निजामभाई सय्यद व इतर अनेक काँग्रेस नेत्यांच्या तालमीत मी तयार झालो असल्याने, तसेच मला दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पद मिळाल्याने नागोठण्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन, या पदाचा उपयोग करून मी नागोठण्यासह रोहा तालुका व दक्षिण रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना वाढविण्यासाठी तसेच नागोठण्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करणार आहे.– अशफाक पानसरे, उपाध्यक्ष दक्षिण रायगड जिल्हा काँग्रेस पक्ष




