Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

ज्योती राऊत यांचा मदतीचा हात 

कीनली ब्रँड कंपनीच्या हजार घरांना पाण्याच्या बाटलींचे वाटप

नागोठण्याच्या पाणीटंचाईत ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत यांचा मदतीचा हात 

कीनली ब्रँड कंपनीच्या हजार घरांना पाण्याच्या बाटलींचे वाटप
नागोठणे | महेश पवार
नागोठणे पासून पेण तालुक्यातील डोलवी पर्यंतच्या सुमारे ४० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागोठण्याजवळील चिकणी येथील के.टी. बंधारा परिसरातील जे एस डब्ल्यू कंपनीची जलवाहिनी फुटल्याने त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर नागोठणे ग्रामपंचायतीच्या प्रभाग  क्रमांक ४ मधील नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी उबाठा शिवसेनेच्या नागोठणे ग्रामपंचायत सदस्या ज्योती संदीप राऊत व त्यांचे पती संदीप राऊत यांनी स्वखर्चाने कुंभार आळी, मराठा आळी, गवळआळी आणि रमाईनगर परिसरातील सुमारे एक हजार घरांमध्ये नावाजलेल्या कीनली ब्रँड कंपनीच्या पाण्याच्या बाटल्यांचा प्रत्येक घरात एक बॉक्सचे (प्रत्येकी १२ बाटल्या) वाटप केले. या उपक्रमाबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
पाणीवाटप उपक्रमात के एम जी विभागातील प्रवीण आमडोसकर, सुनील धुमाळ, सुजित पाटील, शेखर जोगत, सूरज तळेकर, मयूर पाटील, निशांत पाटील, प्रशांत नाकते, यश आमडोसकर, सुशांत धुमाळ, ऋषिकेश भगत, गौरव वाघमारे, प्रमोद महाडिक, संचित भगत, रोहित कळमकर आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी ज्योती राऊत यांनी सहकार्यासाठी कीनली ब्रँडच्या अधिकाऱी मंगेश गोळे व कल्पेश मोरे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!