Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

आरोग्य ही आपली खरी संपत्ती

आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येतील नागरिकांनी घेतला लाभ 

आरोग्य ही आपली खरी संपत्ती असल्याने तिचे जतन करा : सौ. शर्मिला वैंकुठ पाटील 

भाजपाच्या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येतील नागरिकांनी घेतला लाभ 
मुंबईच्या एम जी एम हॉस्पिटलचे सहकार्य 
नागोठणे | महेश पवार
प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी असली तर ते कुटुंब निरोगी राहते आणि पर्यायाने समाजही निरोगी राहण्यास मदत होते. तसेच समाज निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांचे मोलाचे योगदान असते. त्यामुळे आरोग्य ही आपली खरी संपत्ती असल्याने तिचे जतन करा असे बहुमोल मार्गदर्शन करतानाच नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्या असे आवाहन भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ. शर्मिला वैंकुठ पाटील यांनी केले. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून विविध लोकोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई येथील एम जी एम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २१) सकाळी आयोजित केलेल्या  
भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. 
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या आरोग्य शिबिरात हाडांचे आजार तज्ञ, डोळ्यांचे आजार तज्ञ,  गायनॅकॉलॉजिस्ट, जनरल फिजिशियन तपासणी,  इ एन टी स्पेशालिस्ट (कान नाक घसा तज्ञ) यांच्याकडून नागोठणे शहर व विभागातील मोठ्या संख्येतील नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. 
 या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. शर्मिला पाटील यांच्यासह सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी, रोहा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका साळुंखे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, मारुती देवरे, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर, तालुका महामंत्री आनंद लाड, तालुका महामंत्री एकनाथ ठाकूर, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष निखिल मढवी, भाजपा व्यापारी सेलचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सचिन मोदी, नागोठणे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गंगाधर कल्याणकर, एम जी एम हॉस्पिटलचे मेडिकल सोसियल विभागाचे रोहित मिसळे, भाजपा नेते किशोर म्हात्रे, सिराज पानसरे, अशोक अहिरे, धनराज उमाळे, संतोष लाड, ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, शहर अध्यक्ष गणेश घाग, राजू लवटे, अपर्णा सुटे, नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी राजेंद्र पवार, भारत मार्कड, वंदन तांबोळी आदींसह एम जी एम हॉस्पिटल मधील डॉक्टर्सची टीम, आशा  सेविका व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जयेश गोसावी यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडू राबविण्यात येणाऱ्या पेशंटचे पेपरलेस रजिस्ट्रेशन व इतर सुविधांची माहिती देत राज्यातील आयुष्यमान भारत डिजिटल योजनेची सुरुवात राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यात झाल्याचे सांगून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातही ही सुविधा असल्याने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांत समाविष्ट असलेल्या ६ उपकेंद्रातील सुमारे ५७ हजार नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात सोपान जांबेकर, महेश ठाकूर यांनीही शिबिराबद्दल उपयुक्त माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश घाग यांनी केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!