E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाटॉप न्यूज़धार्मिकमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
गणरायाच्या आरतीचा मान
नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांचा केला सन्मान

नागोठणे पोलीस ठाण्यात पत्रकारांना गणरायाच्या आरतीचा मान
नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांचा केला सन्मान
नागोठणे : महेश पवार
कर्तव्याच्या धावपळीत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागोठणे पोलीस ठाण्यात भक्तीभावासोबतच लोकसहभागालाही महत्त्व देण्यात येत आहे. पोलीस ठाण्यातील गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या परिसरातील महिला, तरुणी आणि नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. २६) सकाळी पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि रविंद्र पारखे यांच्या पुढाकाराने पोलीस ठाण्यातील गणेशोत्सवाला यंदा लोकाभिमुखतेची जोड मिळाली आहे.

गणेशोत्सव काळात वाहतूक नियंत्रण आणि बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांना दरवर्षी आपल्या गावाकडील उत्सवात सहभागी होता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन सपोनि रवींद्र पारखे यांनी पोलीस अधिकारी, महिला अंमलदार आणि कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवात भक्तिभावाने सहभागी होण्याची संधी दिली. दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती घेण्यात आल्याने गणेशोत्सवातील बंदोबस्तामुळे आपल्या गावी जाता न आल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पोलीस ठाण्यातील बाप्पांच्या रोजच्या महाआरतीत सहभागी होता आले.

शनिवारी सकाळी आयोजित महाआरतीसाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सहसचिव राजेंद्र जोशी आदींनी गणरायाची आरती केली. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा, सहायक फौजदार राजेश जगताप यांच्या हस्ते पत्रकारांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पो. ह. महेश लांगी, पो. ह. अथर्व पाटील, महिला पोलीस हवालदार मनीषा लांगी, मोनिका शेरमकर, पोलीस शिपाई स्वप्निल भालेराव, सौरभ पाटील, अभिषेक साटम, महिला पोलीस शिपाई सुवर्णा बोडेकर, होमगार्ड भावना भोईर व नागरिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.




