E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifआरोग्यमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

निधीष मेडिकल अँड बेबी केअर शॉपचे उद्घाटन

निधीष मेडिकल अँड बेबी केअर शॉपचे माजी धैर्यशीलदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन 

नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाघ मेडिकलचे मालक प्रशांत वाघ यांच्या पत्नी सौ. मनाली प्रशांत वाघ यांच्याकडून येथील पोस्ट ऑफिस समोरील मन सरोज प्लाझा इमारतीमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या निधीष मेडिकल अँड बेबी केअर शॉपचे उद्घाटन राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२९) सकाळी करण्यात आले. 
निधीष मेडिकल अँड बेबी केअर शॉपच्या या उद्घाटन कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, प्रथम लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच ज्ञानेश्वर साळुंखे, रायगड जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लिलाधर पाटील, कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत वाघ, वरवठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गणपत म्हात्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते महादेव मोहिते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, आनंद लाड,
संजय पाटील, मारुती शिर्के, पळसचे उपसरपंच चंद्रकांत भालेकर, डॉ. सुनील पाटील, डॉ. देविदास शेळके, डॉ. अनिल गीते, डॉ. अभिजित शहासने, विवेक रावकर, तिरत पोलसानी, नितीन राजीवले, ज्ञानेश्वर शिर्के, अपर्णा सुटे, भरत गिजे, सागर शिर्के, गणेश घाग, भाई जांबेकर, विठ्ठल बुरूमकर, जयंत वाघ, स्मिता वाघ, प्रशांत वाघ, मनाली वाघ आदींसह वाघ परिवारातील सदस्य, नातेवाईक व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!