E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifपूरमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

पूरग्रस्त परिसराची स्वच्छता 

आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या कंपन्यांना  आदेशानंतर किशोरशेठ जैन यांच्या पाठपुराव्याला यश 

रिलायन्स व सुप्रीम कंपनीच्या अग्निशामक दलाकडून नागोठण्यातील पूरग्रस्त परिसराची स्वच्छता 

आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या कंपन्यांना  आदेशानंतर किशोरशेठ जैन यांच्या पाठपुराव्याला यश 
नागोठणे | महेश पवार
विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पूरग्रस्त नागोठण्याच्या विविध परिसराचा गुरुवारी (दि.९) सायंकाळी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत असलेले राष्ट्रवादीचे नेते किशोरशेठ जैन यांनी पूरग्रस्तांच्या समस्यांचा पाढा वाचला होता. त्याचवेळी पुरामुळे बाजारपेठ व आजुबाजूच्या परिसरात झालेली घाण त्यामुळे येत असलेली दुर्गंधी लक्षात घेता व बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची होणारी गर्दी पाहता  परिसराची वेळीच साफसफाई केली नाही तर रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने आ. अनिकेतभाई तटकरे यांनी तत्काळ रिलायन्स व सुप्रीम कंपनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर किशोरशेठ जैन यांनी याप्रकरणी दोन्ही कंपनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने त्याला यश येऊन शुक्रवारी सकाळी ९ वाजता आलेली रिलायन्स कंपनीचे अग्निशामक दल व थोड्या वेळाने आलेले सुप्रीम कंपनीचे अग्निशामक दलांनी नागोठण्यातील बाजारपेठ, छ. शिवाजी महाराज चौक, नुक्कड गल्ली, कोळीवाडा, मच्छी, मटण–चिकन मार्केट व अन्य परिसराची साफसफाई केली. दोन्ही कंपन्यांच्या सी एस आर विभागामार्फत ही स्वच्छता करण्यात आली.  यामुळे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांनी आमदार अनिकेतभाई तटकरे व किशोरशेठ जैन यांचे आभार मानले आहेत.

रिलायन्स व सुप्रीम कंपनीचे अग्निशामक दल नागोठण्यातील पूरग्रस्त परिसराची स्वच्छता करण्यासाठी आले त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते किशोरशेठ जैन, नरेंद्रशेठ जैन, भाई टके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, शैलेश रावकर, सिराजभाई पानसरे, नागोठणे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, उपाध्यक्ष अनिल काळे, जुगन जैन, बिपीन सोष्टे, किरण काळे, विजय शहासने, प्रथमेश काळे, ॲड. श्रीकांत रावकर, ग्रामपंचायत सदस्या पूनम काळे, बंटी चोपडा,  सत्यजित रावकर, रिलायन्स सी एस आर विभागाच्या वरदा कुलकर्णी, नागोठणे बाजारपेठेतील व्यापारी तसेच रिलायन्स व सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!