E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाक्राइममहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
नागोठणे पोलिसांकडून छापा सत्र सुरूच
नागोठणे पोलिसांकडून अवैध दारू विरोधातील मोहीम अधिक तीव्र

गावठी दारूची केंद्रे समूळ उच्चाटन करण्यासाठी नागोठणे पोलिसांकडून छापा सत्र सुरूच
नागोठणे पोलिसांकडून अवैध दारू विरोधातील मोहीम अधिक तीव्र
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्हा पोलिस अधिक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि सचिन कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांकडून नागोठणे पोलिस ठाणे हद्दीतील गावठी दारूची केंद्रे समूळ उच्चाटन करण्यासाठी गावठी हातभट्टीची शोधमोहीम व छापा सत्र सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठण्याजवळील वाघ्रणवाडी जंगल परिसरातील गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार वाघ्रणवाडी जंगल परिसरामध्ये अवैधरित्या दारू निर्मिती करून विक्री करता बाळगली जात आहे अशी गुप्त माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे स्वतः रोहाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे, सपोनि सचिन कुलकर्णी, पोलिस हवालदार अथर्व पाटील, पोलिस हवालदार मनोज भोईर, पोलिस शिपाई गणेश चोरगे व दोन पंच या पथकाने वाघ्रणवाडी जंगल परिसरामध्ये सुमारे २५ किलोमीटर आत जंगलात जाऊन गावठी हातभट्टी दारूचा आणखी एक अड्डा उध्वस्त करून या अड्ड्याचे समूळ उच्चाटन केले. या गुन्ह्यांमध्ये एकूण ९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम ६५ (ई) अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस पुढील तपास करीत आहेत.





