E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़

नागोठणे लायन्स क्लबच्या नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

५६ रुग्णांची तपासणी व मोतीबिंदूच्या १९ शस्त्रक्रिया 

नागोठणे लायन्स क्लबच्या नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

५६ रुग्णांची तपासणी व मोतीबिंदूच्या १९ शस्त्रक्रिया 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच 
मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ५६  नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी मोतीबिंदू आढळलेल्या १९ रुग्णांवर शंकरा आय हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 
नागोठणे लायन्स क्लबचे सदस्य लायन नजमुद्दीन व्होरा यांच्या मे. पॉप्युलर ट्रेडर्स नागोठणे यांच्या सौजन्याने येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान मध्ये  हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. नागोठणे लायन्स क्लबकडून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी होणाऱ्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उपक्रमांतर्गत जुलै महिन्याच्या पहिल्या बुधवारी (दि.१) हे मोतिबिंदू शिबिर  घेण्यात आले. 
नागोठणे लायन्स क्लब आणि नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या शिबिराला नागोठणे लायन्स क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष विलास चौलकर, चार्टर्ड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एम जे एफ लायन यशवंत चित्रे, एम जे एफ लायन विवेक सुभेकर, सचिव डॉ. अनिल गीते, नागोठणे लायन्स क्लबचे सर्व लायन सदस्य सखाराम ताडकर, विशाल शिंदे, विजय शहासने, सुनील कुथे, दीपक गायकवाड, अनुराधा शहासने, दीपिका गायकवाड, रोहित चौलकर, शंकर आय हॉस्पिटलचे टीम लीडर विजय बामणे, डॉ. समृद्धी जंगम आदींसह नागोठणे शहर व परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात नागोठणे लायन्स क्लबचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सुभेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!