धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या हस्ते उरणमध्ये पीएनजी ज्वेलर्सचे उदघाटन!
माधुरी दीक्षित यांच्याशी महेंद्रशेठ घरत यांनी मारल्या दिलखुलास गप्पा

धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्या हस्ते उरणमध्ये पीएनजी ज्वेलर्सचे उदघाटन
माधुरी दीक्षित यांच्याशी महेंद्रशेठ घरत यांनी मारल्या दिलखुलास गप्पा
नागोठणे | महेश पवार
सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आणि विश्वसनीय नाव असलेल्या तसेच “वारसा विश्वासाचा” हे आपले ब्रीदवाक्य जोपासणाऱ्या पीएनजी ज्वेलर्सच्या उरण येथील शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा धक धक गर्ल अशी ओळख असलेली बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या हस्ते आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला.

“उरण शहर पूर्वीपासून सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. उरण म्हणजे सोने असे समीकरण आहे. कारण येथे अठरापगड जाती-जमातीचे लोक राहातात. विशेषतः आगरी-कोळी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. आगरी-कोळी समाज प्रचंड मेहनती आहे. तसेच येथील महिलांना कष्टाच्या पैशांत सोने विकत घेऊन हौस भागविण्याची प्रथा आहे. त्यांचे सोने खरेदी केल्याशिवाय पान हालत नाही. त्यामुळे पीएनजी ज्वेलर्सने उरण शहरात केलेले पदार्पण निश्चितच महत्त्वाचे आहे. पीएनजी हा ब्रॅंड तरुणाईमध्ये प्रसिद्ध होत आहे.
पीएनजीने तरुण पिढीच्या गरजा आणि आवडनिवड लक्षात घेऊन व्यवसायात केलेली प्रगती लक्षणीय आहे. त्यांची वाटचाल लवकरच शंभरी गाठण्यापर्यंत लवकरच जाईल. आजोबांचा वारसा त्यांची नातवंडे मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करून चालवत आहेत. ते फक्त सोने विकत नाहीत तर माणसांशी नातेही जपत आहेत. आज उरण शहरात एकेकाळी ‘धक धक गर्ल’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षित यांच्या हस्ते पीएनजी ज्वेलर्सचे उदघाटन करण्याची संकल्पना अफलातून आहे. त्याबद्दल पीएनजी ज्वेलर्सचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !” असेही आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत उरण येथे म्हणाले.

यावेळी महेंद्रशेठ घरत यांचा पीएनजी ज्वेलर्स तर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याशी महेंद्रशेठ घरत यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
यावेळी उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, पनवेल नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, पीएनजीचे सौरभ गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महेंद्रशेठ घरात यांना धक धक गर्ल माधुरी दीक्षित यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.




