E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
नागोठणे एस.टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न
संगीत भजनाने सत्यनारायण पुजेत आली रंगत

नागोठणे एस.टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा उत्साहात संपन्न
संगीत भजनाने सत्यनारायण पुजेत आली रंगत
नागोठणे | महेश पवार
राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारा अंतर्गत असलेल्या नागोठणे एस. टी. स्थानकातील श्री सत्यनारायणाची महापूजा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या महापूजेसाठी रोहा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश शेलार, सहाय्यक वाहतूक अधिक्षक अजिंक्य रोहेकर, वरिष्ठ लिपिक संदीप गायकवाड, कामगार संघटनेचे विभागीय सचिव गणेश शेलार, हेमंत कदम,नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रसाद पाटील, मनोहर पवार
माजी वाहतूक नियंत्रक रघुनाथ खाडे, चंद्रकांत भोईर, माजी वाहक बळीराम बडे, माजी चालक खेळू भोय, रामवाडी येथील विभागीय कार्यालयातील सागर भोईर, सागर ढाणे, निवृत्त वाहक शरद नागोठणेकर व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ही सत्यनारायण महापूजा चालक सौ. व श्री. राकेश चंदने यांच्या हस्ते आणि पुरोहित प्रवीण जोशी यांच्या पौरोहित्याखाली पार पडली. महापूजेनंतर विभागातील चोळेटेप येथील श्री दत्तकृपा प्रसादिक भजन मंडळ यांच्यातर्फे एस टी चालक असलेले बुवा दिनेश पाटील, पखवाज वादक संजय तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे संगीत भजन सादर करून नागोठणे स्थानकात भक्तीमय वातावरण तयार करून रंगत आणली. पूजेनिमित्त अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

नागोठणे स्थानकातील ही महापूजा पार पाडण्यासाठी नागोठणे स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रसाद पाटील, मनोहर पवार तसेच नागोठणे विभागात काम करणारे कर्मचारी दिनेश पाटील, केशव बंगारा, निलेश डाकी, राकेश चंदने, कल्पक म्हात्रे, समीर चंदने, चंद्रकांत बोरकर, महिला वाहक योगिता पाटील, रेश्मा खंडागळे, करुणा ठाकूर, तसेच स्थानकातील परवानाधारक विक्रेते जुनेद दफेदार, प्रथमेश वाळंज, महिला कर्मचारी पूनम लाडगे, सफाई कर्मचारी तसेच स्थानकातील सर्व परवानाधारक तसेच त्यांचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.





