E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
नागोठण्यात श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान
नागोठणे व परिसर झाला चकाचक

नागोठण्यात श्री सदस्यांकडून महास्वच्छता अभियान
नागोठणे व परिसर झाला चकाचक
नागोठणे | महेश पवार
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडा, अलिबाग यांच्या वतीने डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वत्रच महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील विविध भागात तसेच नागोठणे परिसरातील सर्व गावांमध्ये श्री सदस्यांकडून महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे नागोठणे शहर व परिसर चकाचक झाल्याचे दिसून येत आहे.

नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, नागोठणे एस. टी. स्थानक व परिसर, रेल्वे स्थानक परिसर, पोस्ट ऑफिस, नागोठणे पोलिस ठाणे, श्री जोगेश्वरी माता मंदिर परिसर, वनखाते कार्यालय परिसर, हायवे नाका ते उरूस सर्कल रस्ता आदी परिसरात शेकडो पुरुष व महिला श्री सदस्यांनी हे महास्वच्छता अभियान राबविले. नागोठण्यातील या महास्वच्छता अभियानात नागोठण्याच्या सरपंच आणि श्री सदस्य सुप्रियाताई महाडिक, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, माजी सरपंच व श्री सदस्य विलास चौलकर, ग्रामपंचायत सदस्य पूनम काळे, अन्य ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आदींसह श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





