Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठण्यातील जय व्हेज पॉईंटचे राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते शानदार उद्घाटन 

राजिप सदस्य सुमितदादा काते यांनी जय व्हेज पॉईंटला दिल्या शुभेच्छा 

नागोठण्यातील जय व्हेज पॉईंटचे राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या हस्ते शानदार उद्घाटन 

राजिप सदस्य सुमितदादा काते यांनी जय व्हेज पॉईंटला दिल्या शुभेच्छा 
महेश पवार 
नागोठणे : रोहा तालुका आरपीआयचे अध्यक्ष संतोषशेठ गायकवाड यांनी नूतनीकरण केलेल्या त्यांच्या जय व्हेज पॉईंट चायनीज कॉर्नरचे शानदार उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते व शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांच्या हस्ते मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर सुमितदादा काते यांच्या हस्ते हे पहिलेच उद्घाटन होते.   या उद्घाटन प्रसंगी सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांनी संतोष गायकवाड यांना व्यवसायासाठी व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नागोठण्यातील शांतीनगर भागातील कचेरी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जय व्हेज पॉईंट या चायनीज कॉर्नरच्या उद्घाटन प्रसंगी राजिपचे सदस्य सुमितदादा काते, शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांच्यासह शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णा धामणे, दत्तात्रेय शिर्के, महिला आघाडी उपतालुका प्रमुख वर्षा सहस्रबुद्धे, विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, विभाग संघटक दिनेश घाग, शहर अध्यक्ष संतोष चितळकर, निवृत्त विस्तार अधिकारी एस. एन. गायकवाड, भगवान बिनेदार,  लहू तेलंगे,
गणपत म्हात्रे, इम्रान पानसरे, प्रशांत भोईर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशपाक पानसरे, सद्दाम दफेदार, पप्पू अधिकारी, प्रकाश मोरे, अजित दळवी, निलेश वारगे,  संजय कनघरे, दीपक दाभाडे, नेमीचंद मोदी, प्रेषित बिनेदार, सौ पुनम संतोष गायकवाड, विकी मढवी,  विनिता मढवी, जय गायकवाड, हर्ष गायकवाड, विहान हेंडे, याकुब सय्यद आदींसह समाज बांधव व नागोठणे व विभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रेषित बिनेदार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!