Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलाखेलमहाराष्ट्रयुवालोकल न्यूज़

भारताच्या महिला क्रिकेट टीमची रांगोळी साकारणाऱ्या रांगोळीकार योगेश डाकी यांचा जागतिक विक्रम 

बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने केला गौरव

भारताच्या महिला क्रिकेट टीमची रांगोळी साकारणाऱ्या रांगोळीकार योगेश डाकी यांचा जागतिक विक्रम 

बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने केला गौरव 
पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी केले अभिनंदन 

नागोठणे | महेश पवार

नागोठण्याजवळील पळस ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या शेतपळस गावचे सुपुत्र योगेश हसुराम डाकी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची तब्बल २५×३० फूट एवढी भव्य  रांगोळी साकारून जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. सी वुड्स मॉल, नवी मुंबई या ठिकाणी देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ८० किलोग्राम विविध रंग, १४ सहकारी यांच्या सहकार्याने ४८ तासांच्या अथक मेहनती मधून रायगडच्या माती मधील रांगोळी कलाकार योगेश डाकी यांनी आपल्यातील ध्येयाची उंची गाठत जागतिक विक्रमाची नोंद करून “वर्ल्ड्स बिगेस्ट रांगोळी ऑफ इंडियन वूमेन्स क्रिकेट टीम” या योगेश डाकी यांच्या रांगोळीने इतिहास घडविला आहे. या रांगोळीची जागतिक विक्रमात नोंद झाल्याचे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश साकुंडे यांच्या सहीचे प्रमाणपत्र योगेश डाकी यांना देण्यात आले आहे.

ही केवळ रांगोळी नव्हती तर, भारताच्या महिला शक्तीला दिलेला हा मानाचा मुजरा होता. स्वप्नांना दिलेला रंगीत सलाम होता.  या रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटपटू महिलांच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये देशप्रेम, प्रत्येक रंगात जिद्द आणि  प्रत्येक आकृतीत भारताच्या कन्यांचा पराक्रम जिवंत झालेला सर्वांना पहावयास मिळाला.  आम्हाला तुमचा  अभिमान आहे, हे शब्द त्या रांगोळीत झळकत होते.  जिद्द व मेहनत असेल तर ग्रामीण भागातील एखाद्या छोट्याशा गावातील कलाकारही जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरू शकतो हेच योगेश डाकी यांनी आपल्या कलाकृतीतून दाखवून दिले आहे. 

मध्य रेल्वेत कार्यरत असूनही आपली रांगोळीची कला जोपासणाऱ्या योगेश डाकी यांच्या या यशाबद्दल पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी योगेश डाकी यांच्या शेतपळस येथील निवासस्थानी आपले पती योगेश विचारे यांच्यासह भेट घेऊन योगेश डाकी व त्यांची पत्नी पूजा योगेश डाकी यांचे अभिनंदन केले. तसेच तुमच्या कलेच्या माध्यमातून तुमची कला,  तुमची झेप उंचावत जाओ आणि तुमच्या नावावर असेच विक्रम नोंदवले जावोत अशा शुभेच्छा पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी योगेश डाकी यांना दिल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!