Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठणे व परिसरात होळी सण उत्साहात साजरा 

नागोठणे शहर व ग्रामीण भागात धुळवड उत्साहात

नागोठणे व परिसरात होळी सण उत्साहात साजरा

नागोठणे शहर व ग्रामीण भागात धुळवड उत्साहात

नागोठणे | महेश पवार

नागोठणे शहर व ग्रामीण भागातील सर्व गावे, आदिवासी  वाड्या तसेच सर्व परिसरांत होलिकोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  नागोठणे शहरांत खडक आळी, आंगर आळी, कोळीवाडा, केएमजी विभाग, जोगेश्वरी नगर,  मुरावाडी आदींसह विविध भागांत पारंपारिक पद्धतीने होळ्या रचण्यात आल्या होत्या. यावेळी होळीची विधिवत पूजा करण्यासाठी सर्वच ठिकाणी महिला वर्गाची मोठी गर्दी झाली होती.

 

काही हौशी मंडळीने तर होळीच्या सभोवती नेत्रदिपक विद्युत रोषणाई व सजावट केली होती. सर्व ठिकाणी पारंपारिक पद्धतीने वाजत, गाजत, नाचत, गाणी म्हणत होळीला पाच फेऱ्या मारण्यात आल्या. त्यानंतर होळी लावण्यात आली. नागोठणे व शहर परिसरात रात्री १२ वाजण्याच्या आत सर्व होळ्या लावण्यात आल्या.

याशिवाय नागोठणे शहर व ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी अबाल वृद्धांकडून धुळवड सणही मोठ्या उत्साहात व रंगांची उधळण करून साजरा करण्यात आला. नागोठणे शहरातील विविध ठिकाणी, विशेष करून खडक आळी, आंगर आळी, के एम जी विभाग, बाजारपेठ, मुरावडी, जोगेश्वरी नगर व इतर ठिकाणी तरुणाई कडून धुलीवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच नागोठण्यातील विविध भागांतील हौसिंग सोसायट्यांमध्ये येथील नागरिकांनी मिळून धुलीवंदन सण पारंपरिक पद्धतीने व उत्साही तसेच आनंदी वातावरणात साजरा केला.

होळी व धुलीवंदन सणांच्या पार्श्वभूमीवर नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शांतता समितीची बैठक घेऊन सर्व गावांतील पोलिस पाटील व नागरिकांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे या होलिकोत्सव सणाचा सर्वांनी उत्स्फूर्त आनंद घेतल्याने नागोठणे शहर व ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!