E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण

कुमार साई म्हात्रे पिगोंडे गावचे नाव रोशन करेल

पिगोंडेतील उगवता तारा कु. साई म्हात्रेवर सत्काराचा वर्षाव 

कुमार साई म्हात्रे पिगोंडे गावचे नाव रोशन करेल : समृद्धीताई कोळी 

पिगोंडेतील उगवता तारा कु. साई म्हात्रेवर सत्काराचा वर्षाव 
नागोठणे | महेश पवार
राजिपच्या पिगोंडे शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार साई योगेश म्हात्रे याने चांगले यश मिळवत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भेटीसाठी त्याची झालेली निवड ही पिगोंडे गावासाठी अभिमानाची गोष्ट असून भारताची प्रमुख राष्ट्रीय अंतराळ संस्था असलेल्या इस्रो
मधील अनेक चांगल्या तंत्रज्ञानाची माहिती साई म्हात्रे याला मिळणार आहे. त्यामुळे कुमार साई म्हात्रे पिगोंडे गावचे नाव भविष्यात नक्कीच रोशन करेल असे गौरवोद्गार रोहा पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य समृद्धीताई कोळी यांनी कुमार साई म्हात्रे याच्या पिगोंडे ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. २) सकाळी संपन्न झालेल्या  छोटेखानी सत्कार सोहळ्यात काढले. 
गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून इस्रो भेटीसाठी निवड झालेल्या राजिप पिगोंडे शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कुमार साई योगेश म्हात्रे याचे यश पाहून रोहा पंचायत समिती सदस्य समृद्धीताई संतोष कोळी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष व पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष जनार्दन कोळी यांनी रोख पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ देऊन तसेच ग्रुप ग्रामपंचायत पीगोंडे यांनीही रोख पाच हजार रुपये,शाल आणि सन्मान चिन्ह देऊन
साई म्हात्रे याचा यथोचित गौरव केला आहे. या छोटेखानी कार्यक्रमासाठी रोहा पंचायत समिती सदस्या समृद्धीताई कोळी, संतोषभाई कोळी, शिक्षक सोनल पाटील, कमळाकर लेंडी, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समिती सदस्य समृद्धीताई कोळी आपल्या मनोगतात पुढे म्हणाल्या की,  देशाच्या विकासासाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करणे, उपग्रहांची निर्मिती आणि प्रक्षेपण करणे, आणि अवकाश संशोधन करणे ही इस्रोची मुख्य कामे आहेत. उपग्रह प्रक्षेपण (Satellite Launching),  दळणवळण (Communication), हवामान अंदाज, आणि पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा अभ्यास करण्यासाठी इस्रो विविध उपग्रह अंतराळात पाठवते. अशा अनेक तंत्रज्ञानाची माहिती त्यांना त्या ठिकाणी अवगत होईल.  याचा पुरेपूर लाभ साई म्हात्रे याने घ्यावा असे बोलून त्यांना साई म्हात्रे याला पुढील यशासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटी ही संस्था इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी २०११ पासून स्पर्धा परीक्षा आयोजित करत आहे. रायगड जिल्ह्यात प्रथमच ही परीक्षा भाजप रोहा तालुका शिक्षण सेल अध्यक्ष अशोक अहिरे यांच्या देखरेखीखाली घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातून तब्बल ३,६१७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामधून रायगडचे चार विद्यार्थी इस्रो भेटीसाठी निवडले गेले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!