E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
कुमार स्वरूप संतोष लाड याचे एमएच सीईटी परीक्षेत यश
सीईटी परीक्षेत मिळाले ९९.०४ टक्के गुण

कुमार स्वरूप संतोष लाड याचे एमएच सीईटी परीक्षेत यश
सीईटी परीक्षेत मिळाले ९९.०४ टक्के गुण
नागोठणे | महेश पवार
महाराष्ट्र एमएच सीईटी परीक्षेचा (पीसीएम – फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) गटाचा निकाल नुकताच अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत नागोठण्याजवळील हेदवली येथील कु. स्वरूप संतोष लाड या विद्यार्थ्याने ९९.०४ टक्के गुण मिळवून नेत्रदिपक यश मिळविले आहे. कुमार स्वरूप हा भाजपाचे नागोठणे विभागातील कार्यकर्ते आणि विधानसभेच्या पेण–नागोठणे–सुधागड मतदारसंघातील आमदार रविशेठ पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले संतोष लाड यांचा मुलगा आहे. कुमार स्वरूप लाड याला एमएच सीईटी परीक्षेसाठी मुसळे क्लासेस, औंध–पुणे येथील प्रा.भास्कर मुसळे, अनुज मुसळे, अनुप मुसळे, अश्विनी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
कुमार स्वरूप लाड याने जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूल मधून इयत्ता १० पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून दहावीच्या सीबीएसई परीक्षेत त्याने ८० टक्के गुण मिळविले आहेत. तर भारत इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पुणे येथून बारावी शस्त्र शाखेत ८२.३२ टक्के गुण मिळविले आहेत. कुमार स्वरूप लाड याच्या सीईटी परीक्षेतील या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.




