Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़शिक्षण

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू देणार नाही : राजिप सदस्य सुमितदादा काते 

नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंतीला स्नेहभोजन 

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना काहीही कमी पडू देणार नाही : राजिप सदस्य सुमितदादा काते 

नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिवजयंतीला स्नेहभोजन 

शिवसेना विभागीय संघटक दिनेश घाग यांचा आगळावेगळा उपक्रम 
नागोठणे | महेश पवार 
डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेच्या वस्तीगहात राहत आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे व त्यांना घडविण्याचे काम येथील शिक्षक करीत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. सध्या पालकांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे असल्याने मराठी इंग्रजी भेदभाव न येथील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण द्या आणि शाळेचा कमी झालेला विद्यार्थी पट वाढवून विद्यार्थ्यांना घडवा. आपल्या कमाईतून काही वाटा समाजासाठी खर्च करण्याच्या विचाराचे आम्ही असल्याने या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मी आणि मनोजदादा खांडेकर काहीही कमी पडू देणार नाही असे ठोस आश्वासन राजिप सदस्य सुमितदादा काते यांनी देतानाच सर्व विद्यार्थ्यासाठी लवकरात लवकर गणवेश देण्यात येतील असे जाहीर केले.  याचवेळीं आश्रम शाळेची स्वतःची जागा वांगणी येथे असल्याने तेथे आश्रमशाळेच्या इमारतीसाठी समाजकल्याण खात्यामार्फत पाठपुरावा केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग यांनी मुंबई येथील नागसेन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धिस्ट कल्चर ट्रस्ट द्वारा संचलित नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांसाठी शिवजयंतीच्या दिवशी सलग दुसऱ्या वर्षी स्वखर्चाने आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमितदादा काते बोलत होते.
राज्यात सर्वत्रच शिवजयंती अनेक वैविध्यपूर्ण धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व इतर अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरी केली जात असतांनाच  नागोठण्यातील गवळ आळीतील रहिवासी असलेले तसेच शिवसेनेचे नागोठणे विभाग संघटक दिनेश घाग यांनी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचा बेत आखून शिवजयंती आगळ्या वेगळ्या उपक्रमाने साजरी केली. या स्नेहभोजनाचा राजिप सदस्य सुमितदादा काते व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत बसून आस्वाद घेतला.
दिनेश घाग यांनी आश्रम शाळेत आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या वेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, नागोठणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विलास चौलकर, प्रकाश मोरे, शिवसेना नागोठणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, उबाठा शाखा प्रमुख राजेश सुर्वे, बाळू रटाटे, मंदार कोतवाल,  आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर, संजय नांगरे, संजय कनघरे, राज दुर्गावले, शिक्षक सखाराम सांबरे, जयश्री उमाळे, वनिता पाटील, सखाराम सांबरे, गंगासागर शेलार, संतोष ईप्ते आदींसह आश्रम शाळेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आई-वडिलांपासून खूप दूर राहून शिक्षण घेत असलेल्या आश्रम शाळेतील या छोट्या मुलांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करून समाजात एक वेगळा संदेश देणारे दिनेश घाग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!