Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकायदा व सुव्यवस्थाराज्यलोकल न्यूज़

अपहरित मुलीचा सहा तासांच्या आत शोध घेण्याची नागोठणे पोलिसांची दमदार कामगिरी

अपहरित मुलगी सुखरूपपणे केली आई वडिलांच्या स्वाधीन 

अपहरित मुलीचा सहा तासांच्या आत शोध घेण्याची नागोठणे पोलिसांची दमदार कामगिरी 

अपहरित मुलगी सुखरूपपणे केली आई वडिलांच्या स्वाधीन 
नागोठणे | महेश पवार 
नागोठणे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अज्ञान मुलगी अपहरित प्रकरणी नागोठणे पोलिसांनी वैज्ञानिक व तांत्रिक तपासाच्या आधारे त्या मुलीचा शोध सहा तासांच्या आत लावण्याची दमदार कामगिरी केली आहे. या अपहरित मुलीला सुखरूपपणे तिच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आली आहे. नागोठणे पोलिसांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व या प्रकरणाच्या टीममध्ये सहभाग असलेल्या पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाणे गुन्हा र. क्र. ४२/२०२६ कलम १३७(२) दिनांक २१/२/२०२६  अन्वये दाखल गुन्ह्यातील अपहरित बालिका हिचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी स.पो. नि. सचिन कुलकर्णी यांनी तात्काळ दोन पथके रवाना करून सीसीटीव्ही फुटेज याचे आधारे गुन्ह्यातील अपहरित मुलगी हिचा शोध सुकेळी परिसरात घेतला होता. त्यानुसार सदर मुलगी ट्रकने पनवेल येथे गेली असल्याचे समजल्याने पनवेल येथून शिवडी मुंबई परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. शिवडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोध घेतला असता ती शिवडी परिसरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये मिळून आलेली आहे. सदर अपहरित मुलगी हीस शिवडी पोलीस ठाण्यात नेऊन जवळच्या वैद्यकीय सरकारी रुग्णालयांमध्ये तिची वैद्यकीय तपासणी करून  सदर मुलगी हिला सुखरूप ताब्यात घेऊन तिला आई-वडिलांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आले आहे. आई वडील रागावल्यामुळे सदर मुलगी घरातून रागावून निघून गेली असलेले ची माहिती सदर मुलीने दिली.
ही कामगिरी ही रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागोठणे प्रभारी अधिकारी स.पो.नि सचिन कुलकर्णी, पो. उ.नि. गोटीराम पावरा, महिला सहाय्यक फौजदार संचिता सानप, पो.हवा. चंद्रशेखर नागावकर यांनी केलेली असून रायगड पोलीस दलातील  नागोठणे पोलीस ठाण्याने  केलेल्या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!