E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifराजकारणराज्यलोकल न्यूज़
नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनने केले राजिप सदस्य सुमितदादा काते यांचे अभिनंदन
नागोठणे मतदार संघाच्या विकासात पत्रकार असोसिएशन सहकार्य करणार

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनने केले राजिप सदस्य सुमितदादा काते यांचे अभिनंदन
नागोठणे मतदार संघाच्या विकासात पत्रकार असोसिएशन सहकार्य करणार
नागोठणे : रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे नवनिर्वाचित सदस्य सुमितदादा काते यांचे रायगड जिल्ह्यातील नावाजलेली पत्रकार संघटना असलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन कडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बुधवारी (दि.११) सकाळी राजिप सदस्य सुमितदादा काते यांच्या नागोठण्यातील निवासस्थानी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य राजेश पिंपळे यांनी राजिप सदस्य सुमितदादा काते यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, नागोठणे विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, निलेश साळवी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजिप सदस्य सुमितदादा काते यांचे अभिनंदन करतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे मतदार संघातील सर्व विकासकामांसाठी तसेच मतदार संघातील गावे, आदिवासी वाड्या यांवर रखडलेले विविध प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी तसेच जनतेच्या हिताच्या योजनांसाठी आणि सर्व विधायक कामांत नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन आपल्या सोबत असेल असे अभिवचन यावेळी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश पवार यांनी राजिप सदस्य सुमितदादा काते यांना दिले.



