E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
बाळसई येथे सोमवारी आई श्री बेलजाई मातेचा पालखी सोहळा

बाळसई येथे सोमवारी आई श्री बेलजाई मातेचा पालखी सोहळा
नागोठणे (दिनेश ठमके) : नागोठण्याजवळील बाळसई (ता.रोहा) या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाळसई गावची ग्रामदेवता व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या आई श्री. बेलजाई मातेचा पालखी सोहळा सोमवार दि. २३ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात पार पडणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात सोमवारी सकाळी ८ वाजता सर्व बाळसई ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मुर्तीवर दुग्ध अभिषेक व होमहवन करुन होणार आहे त्यानंतर दुपारी उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आल्यानंतर सायंकाळी ४ वाजता संपूर्ण बाळसई गावातुन पालखीतून श्री. बेलजाई मातेच्या पादुका दर्शन मिरवणूक सोहळा पार पडेल. पालखी सोहळा मंदिरात गेल्यानंतर सायंकाळी ७ वाजता वारकरी भजन मंडळ, महिला मंडळ बाळसई यांचा हरिपाठ होईल. तद्नंतर या भव्यदिव्य अशा पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना महाप्रसाद दिल्यावर रात्री ग्रामस्थ व वारकरी भजन मंडळ बाळसई यांचा जागरणाचा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, श्री. बेलजाई मित्र मंडळ मुंबई – बाळसई , बेलजाई क्रिडा मंडळ बाळसई मेहनत घेत आहेत.




