E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलामहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
खासदार सुनील तटकरे उद्या नागोठण्यात
नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनच्या पुरस्कारांचे होणार वितरण

खासदार सुनील तटकरे उद्या नागोठण्यात
नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनच्या पुरस्कारांचे होणार वितरण
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नागरिकांचा, विद्यार्थ्यांचा व क्रीडापटूंचा होणार गौरव
नागोठणे | महेश पवार
गेल्या तेरा वर्षांपासून सातत्याने आपला वर्धापन दिन नित्यनियमाने साजरा करून रायगड जिल्ह्यासह नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा चौदावा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे लोकप्रिय खासदार, लोकनेते सुनील तटकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत तसेच रजिपचे उपाध्यक्ष मधुकरशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला रजिपचे सदस्य सुमितदादा काते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरभाई जैन, नरेंद्रशेठ जैन, रायगड जिल्हा दिशा समिती सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीचे सभापती सदानंद गायकर, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सुधागड पंचायत समितीचे उपसभापती संदेश शेवाळे, रोहा पंचायत समितीच्या सदस्या समृद्धी कोळी, अरुणा हंबीर, पाली येथील उद्योजक राजेश मपारा, सोपानभाऊ जांबेकर, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सद्दाम दफेदार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी पत्रकार असोसिएशनकडून जय्यत तयारी करण्यात आली असून पत्रकार असोसिएशनचा मानाचा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दापोली (जि. रत्नागिरी) येथील पत्रकार यशवंत कांबळे यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार पनवेल येथील पत्रकार प्रशांत शेडगे यांना तर युवा पत्रकार पुरस्कार माणगाव येथील पत्रकार परेश शिंदे यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच नागोठणे शहर व ग्रामीण विभागासह रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी व क्रीडापटूंचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
पत्रकार असोसिएशनचा हा वर्धापन दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे मार्गदर्शक भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ॲड. महेश पवार, सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम, सहसचिव राजेंद्र जोशी तसेच सदस्य विनोद भोईर, सुनिल कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्रबुद्धे आदी पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.




