E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
नागोठणे गवळआळीतील श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न
मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला महाप्रसादाचा (भंडारा) लाभ

नागोठणे गवळआळीतील श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा उत्साहात संपन्न
मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला महाप्रसादाचा (भंडारा) लाभ
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील गवळ आळी येथील शि वसह्याद्री मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ गवळआळी यांच्या वतीने श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा गुरुवार दि. २६ मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गवळ आळीतील या श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळ्याचे हे सलगपणे १६ वे वर्ष होते. या पालखी सोहळ्यासाठी गवळ आळीसह के. एम. जी. विभाग व नागोठण्यातील ग्रामस्थ व साई भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी साई भंडाऱ्याचा लाभ घेतला.

गवळआळीतील श्री गणेश, राधाकृष्ण, श्री साईबाबा मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या श्री साईबाबा उत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक सात वाजता श्री साईबाबांना दुग्धअभिषेक घालून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ वाजता ध्वजपूजन करण्यात आलें. नंतर अनेक धार्मिक पूजा विधी व होमहवन करण्यात आले. या पूजाविधीचा मान श्री. व सौ. प्राची गणेश घाग, श्री व सौ. स्नेहल सिद्धेश कदम, श्री व सौ. योगिता दिनेश वादळ, श्री व सौ. साक्षी प्रणव वादळ आणि श्री व सौ. विशाखा प्रथमेश पाटील या जोडप्यांना मुलाला.

त्यानंतर दुपारी ठीक १२.०० वा. श्री साईबाबांची महाआरती घेण्यात आली. आरतीनंतर साईबाबांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी साई भक्तांच्या गर्दीने मंदिर फुलून गेला होता. या महाआरतीने संपूर्ण गवळआळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नंतर सायंकाळी ६.३० वाजता श्री साईबाबांच्या पालखीची वाजत गाजत सुरुवात करण्यात आली. ही पालखी संपूर्ण गवळआळीत फिरविण्यात आली. यावेळी सर्व आबाळ-वृध्दांनी पालखीत नाचण्याचा आनंद लुटला. अखेर रात्री ९.३० वाजता मंदिरात पालखीची सांगता झाली. श्रीसाईबाबा उत्सव व पालखी सोहळ्यासाठी गवळआळी मधी ल श्री गणपती, राधाकृष्ण, साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेल्या मान्यवरांचा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष विलास चौलकर यांच्या हस्ते साईबाबांची मानाची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त गवळआळीतील साईभक्त श्री व सौ. साक्षी किरण वादळ यांनी उपस्थित भाविकांसाठी आयोजित केलेल्या साई भंडाऱ्याचा सर्व साई भक्त व ग्रामस्थांनी लाभ घेतला. श्री साईबाबा उत्सव व पालखी सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री गणेश, राधा कृष्ण, श्री साईबाबा मंदिराचे विश्वस्त समितीचे व ग्रामस्थ मंडळ गवळआळीचे अध्यक्षविलास चौलकर, सचिव सुदाम घाग, शिवसह्याद्री मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप राऊत, उत्सव समितीचे अध्यक्ष शेखर जोगत, उपाध्यक्ष शुभम घाग, सचिव सुजित चौलकर, सहसचिव राजू पाटील, खजिनदार दर्शन वादळ, सहखजिनदार प्रशांत नाकटे, कार्याध्यक्ष रुपेश जगताप, सनील धुमाळ आदींसह उत्सव समितीचे सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ व महिला मंडळाने मेहनत घेतली.




