E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रलोकल न्यूज़

नागोठणे व पाली ग्रामस्थांचे आरोग्य रक्षक डॉ. राजेंद्र धात्रक यांचे निधन

नागोठणे व पाली ग्रामस्थांचे आरोग्य रक्षक डॉ. राजेंद्र धात्रक यांचे निधन

नागोठणे | शामकांत नेरपगार : नागोठणे व पाली येथील ग्रामस्थांच्या तब्येतीची वेळोवेळी काळजी घेणारे सर्वांची आपुलकीने चौकशी करणारे नागोठणे व पाली ग्रामस्थांचे आरोग्य रक्षक रोहा तालुका मेडिकल असोसिएशनचे कार्यतत्पर माजी अध्यक्ष रोहा पंचायत समितीचे अभ्यासू माजी सदस्य नागोठणे गावचे प्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र बाबुराव धात्रक यांचे शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आजाराशी झुंजत असताना वयाच्या ६२ व्या वर्षी आकस्मित निधन झाले. डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागोठणे व पाली सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या निधनाने आरोग्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्व. डॉ. राजेंद्र धात्रक यांनी आपल्या पंचायत समिती सदस्य पदाच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे करून आपल्या अभ्यासू वृतीचे जनतेला दर्शन घडविले होते.

खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजासाठी अनेक योजना आणून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला होता. स्व. डॉ. राजेंद्र धात्रक यांनी सर्व समाजाला न्याय देण्याचे कार्य केले होते. स्व. डॉ राजेंद्र धात्रक हे काही दिवसांपासून आजारी होते. ते आजारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या निवासस्थानी भेट देऊन डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या तब्यतेची चौकशी करून त्यांना धीर दिला होता.

त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी डॉ. राजेंद्र धात्रक यांचे सुपुत्र डॉ. सनी धात्रक (एम. एस) यांचा विवाह ठाणे येथे संपन्न झाला त्यावेळी तब्येत बरी नसताना देखील डॉ. राजेंद्र धात्रक प्रत्येकाची हातवारे करून चौकशी करून जेवून जा अशी हात जोडून विनंती करीत होते. अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले याचे नागोठणकरांना फारच दुःख होत आहे. डॉ. राजेंद्र धात्रक यांच्या पश्चात आई, पत्नी रिचा धात्रक, मुलगी डॉ. स्वप्नाली मेघराज हळंबे (एम.डी), मुलगा डॉ. सनी धात्रक (एम. डी), जावई डॉ. मेघराज होळंबे (एम. एस) नातू, सून डॉ. स्नेहा धात्रक, बंधू डॉ. मिलिंद धात्रक, मनोज धात्रक, बहीण असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!