Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifधार्मिकमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठणे शहरात रमजान ईद उत्साहात साजरी 

नागोठणे सपोनि सचिन कुलकर्णी यांनी जामा दिल्या शुभेच्छा 

नागोठणे शहर व परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी 

सदिच्छांची देवाणघेवाण अन् सलोख्यासाठी मागितली दुआ
नागोठणे सपोनि सचिन कुलकर्णी यांनी जामा मस्जिद येथे दिल्या शुभेच्छा !
नागोठणे | महेश पवार
उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व म्हणजे रमजान ईद ! जिल्ह्यात ठिकठिकाणी ईदचा उत्साह असतानाच मुस्लीम बांधवांचा पवित्र व ऐक्याचा सण असलेली रमजान ईद नागोठणे शहर व विभागात उत्साहात साजरी करण्यात आली.  जामा मस्जिद नागोठणे, दारूल मोहल्ला मस्जिद,  जामा मस्जिद मिरानगर, जामा मस्जिद बेणसेसह इतर ठिकाणी नमाज पठण करून मुस्लीम बांधवांकडून ईदचा सण हा आनंद, उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय नेतेमंडळींपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी ईदच्या या पर्वात सहभागी होत मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यासह मुस्लीम बांधवांनीही ईदची दुआ करताना सर्वांना सुख समाधान मिळण्यासह सलोख्यात वाढ व्हावी, अशी दुआ अल्लाहकडे मागितली. मुख्य जामा मस्जिद मध्ये नवीन कपडे घालून तसेच नाविन्यपूर्ण पेहराव करून आलेल्या छोट्या मुलांची यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. शहर व परिसरात मुस्लिम बांधवांमध्ये नवचैतन्य वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी (दि.२१) सकाळी येथील मुख्य जामा मस्जिद मध्ये सकाळचे नमाज पठन केल्या नंतर उपस्थित मुस्लीम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, हे. कॉ. महेश रुईकर, हे. कॉ. महेश लांगी, हे. कॉ. राकेश राऊळ, पोलिस शिपाई बळी पुट्टेवाड यांनी शहरातील मुख्य जामा मस्जिद येथे जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
नागोठणे शहर जातीय सलोखा व हिंदू मुस्लीम बांधवांच्या एकतेसाठी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने नागोठणे शहरातील अनेक हिंदू बांधवांनी मोहल्ल्यात जाऊन मुस्लीम समाजातील आपल्या मित्रपरिवाराला रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. मुस्लीम बांधवांनीही आपल्याकडे शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हिंदू बांधवांना शिरखुर्मा या प्रसिद्ध पदार्थासह इतर अनेक चविष्ट पदार्थांची मेजवानी दिली. यावेळी शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाणे हद्दीत सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!