E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़
वांगणी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेत श्री माणकेश्वर आमडोशी संघ विजेता
बॉडी बिल्डर रोहन ठाकूर यांची उपस्थिती

(फोटो : बॉडी बिल्डर रोहन ठाकूर व श्रुती ठाकूर यांचा सत्कार करताना कमलाकर तेलंगे, राकेश भिसे, विकास ठाकूर व तेजस तेलंगे)
वांगणी येथील भव्य क्रिकेट स्पर्धेत श्री माणकेश्वर आमडोशी संघ विजेता
बॉडी बिल्डर रोहन ठाकूर यांची उपस्थिती
नागोठणे | महेश पवार
ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने नागोठण्याजवळील वांगणी येथील श्री मरीआई क्रिकेट क्लब यांच्या वतीने ७ व ८ मार्च रोजी वांगणीतील श्री मरीआई क्रीडांगण, चामुटी शेतात आयोजित करण्यात आलेल्या भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्री माणकेश्वर आमडोशी संघाने एस. के. पी. कानसई संघाचा पराभव करून १० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक व आकर्षक चषक पटकाविला. कानसई संघाला उपविजेतेपदाचे ७ हजार रुपये व चषकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत शिवतेज आमडोशी व जे. बी. सी. पळस यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी ४ हजार रुपयांचे बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील मालिकावीर ठरलेला आमडोशी संघाचा हरेश भोसले याला विनायक महादू तेलंगे पुरस्कृत १५ हजार रुपये किंमतीचा डायमंड देण्यात आला. तर उत्कृष्ट फलंदाज अजित ढाणे (कानसई), उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश दळवी (आमडोशी), सामनावीर निलेश खांडेकर (आमडोशी) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निषाद भालेकर (पळस) यांनाही सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या निमित्ताने वांगणी येथील मरीआई क्रिकेट क्लबचे कमलाकर तेलंगे यांच्या विनंतीला मान देऊन खास करून उपस्थित राहिलेले आणि तरुणांचे आकर्षण असलेले रेवदंडा येथील बॉडी बिल्डर रोहन ठाकूर आणि त्यांच्या पत्नी श्रुती ठाकूर यांचा यावेळी मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच ८ मार्च या महिला दिनाचे औचित्य साधून श्रुती ठाकूर यांच्या हस्ते वांगणी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मालिका भिसे, माजी उपसरपंच रसिका तेलंगे, नम्रता भिसे, अर्चना तेलंगे, रसिका भिसे, कविता ठाकूर, रुपाली तेलंगे, कल्पना दंत या महिलांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.

या स्पर्धेदरम्यान रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य व वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय भोसले, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र तेलंगे, मोरेश्वर तेलंगे, कमलाकर तेलंगे, मधुकर तेलंगे, विनायक तेलंगे, कांचन ठाकूर, अंकुश तेलंगे, नरेंद्र भिसे, वैभव भिसे, दिलीप तेलंगे, विलास भिसे, राकेश भिसे, विकास ठाकूर, तेजस तेलंगे व ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. दोन दिवस चाललेली ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री मरीआई क्रिकेट मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी अपार मेहनत घेतली.




