E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़
एस. टी. चे सेवानिवृत्त वाहक विठोबा भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन

एस. टी. चे सेवानिवृत्त वाहक विठोबा भोसले यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे | महेश पवार
नागोठण्यातील आंगर आळी मधील रहिवासी विठोबा सखाराम भोसले (वय ७८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नागोठणे अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भोसले यांचे नातेवाईक, नागोठणे शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच आंगर आळीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत विठोबा भोसले यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा मनोज, चार विवाहित मुली मिना भारसिंग, मनीषा शिंदे, मालती कळंबे व भारती सकपाळ, सून, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत विठोबा भोसले हे राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. आंगर आळीतील सर्व सामाजिक, धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात त्यांचे हेच कार्य त्यांचा मुलगा मनोज हा सांभाळत आहे. शांत व प्रेमळ स्वभावाच्या विठोबा भोसले यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. विठोबा भोसले यांचे उत्तरकार्य शनिवार दि. ४ जुलै रोजी आंगर आळीतील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती भोसले कुटुंबियांकडून देण्यात आली.




