E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराजकारणराज्यलोकल न्यूज़
दुष्काळग्रस्त रायगडचा पाहणी दौरा
राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची दौऱ्यात ठोस भूमिका

दुष्काळग्रस्त म्हणून वगळलेले रायगडसह कोकणातील सर्व तालुके समाविष्ट करण्यासाठी आग्रह
राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची दौऱ्यात ठोस भूमिका
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्ह्यासह कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. आज ज्या पेरण्या आणि भाताच्या लावण्या झाल्या आहेत. ते पीक आज पावसाअभावी पिवळे पडले आहे. अनेक ठिकाणी पीक करपले आहे. खाडीपट्ट्यामध्ये कंपन्यांनी सोडलेल्या केमिकलमुळे शेतकऱ्यांची शेती नापिकी झाली आहे. शेतकरी हवालदिन आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावी अशी आग्रही मागणी राज्य सरकारकडे केली आहे. रायगडमध्येही आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त म्हणून वगळलेले रायगडसह कोकणातील सर्व तालुके समाविष्ट करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली ठोस भूमिका नागोठणे येथे प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.

राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करताना रायगड मध्ये केवळ श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून समावेश केला. वास्तविक पाहता रायगड जिल्ह्यातील उर्वरित १४ तालुक्यांना देखील दुष्काळ जाहीर होणे गरजेचे असताना उर्वरित तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डावळल्याच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष सज्जाद डावरे, जिल्हा सचिव श्रीहर्ष कांबळे, रुपेश खांडवे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर, रोहा तालुका अध्यक्ष तुषार खरीवले, रोहा तालुका युवक अध्यक्ष मुजाहिद मुजावर, रत्नाकर मोकल, सहैफ शेख, मेधा खरीवले, दिनेश काटकर, राजू रोडेकर, आरिफ दुकानदार, अबू गोरमे, अजय डावरे आदींसह नागोठणेसह रोहा, सुधागड, माणगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेले कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावून त्यांना त्रास देऊ नका अशा स्पष्ट सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. असे असतानाही कोणती बँक अगर सावकार शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर तिथे राजकारण बाजूला ठेवून, आपल्या कार्यकर्त्यांनी पोचून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे शेतकऱ्यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत असा विश्वास निर्माण केला पाहिजे अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केल्या.
शशिकांत शिंदे यांनी पुष्पगुच्छ नाकारले :–
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी दुष्काळग्रस्त रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. दौऱ्यादरम्यान शशिकांत शिंदे प्रसार माध्यमांशी बोलण्यासाठी नागोठणे येथे काही वेळ थांबले असता पक्षाचे रोहा, सुधागड व अन्य तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन गेले असता शशिकांत शिंदे यांनी, आपण दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आलो असल्याचे सांगत पुष्पगुच्छ नाकारले.




