E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifकलाकामगार क्षेत्रप्रशिक्षण शिबिरमनोरंजनमहाराष्ट्रराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़शिक्षण

मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न 

नागोठणे शहर व परिसरातील महिलांनी घेतला लाभ

महिला उद्योजकता शिबिर अंतर्गत विशेष मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न 

नागोठणे शहर व परिसरातील महिलांनी घेतला लाभ
नागोठणे | महेश पवार
मनसे महिला सेना आणि रेणुका फाउंडेशन, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे एसटी स्थानकाजवळील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत महिला उद्योजकता शिबिर अंतर्गत विशेष मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्या रॅम्प योजनेअंतर्गत नागोठणे शहर व परिसरातील स्थानिक महिलांसाठी हे शिबिर पूर्णतः मोफत आयोजित करण्यात आले होते. महिलांनी स्वतःचा रोजगार निर्माण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपली आर्थिक उन्नती करावी, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. 
या शिबिरात महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी व्यवसायाच्या विविध संधी आणि उद्योग निवडण्याची तंत्र, बाजारपेठ सर्वेक्षण करणे, वस्तूंची किंमत ठरविणे आणि बाजारपेठेत वस्तूंची विक्री करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देणे आदी अनेक बाबतीत या शिबिरात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात मार्गदर्शक व प्रवक्ते डॉक्टर दिनेश गुप्ता, रेणुका फाउंडेशनच्या अध्यक्षा शितल देवलाळकर, रेणुका फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रणिता भोसले, उपाध्यक्षा मनीषा नगरकर, सभासद परेश आंधळे आदींसह नागोठणे शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
या महिलांच्या भोजनाची व्यवस्थाही आयोजकांकडून करण्यात आली होती. महिला उद्योजकता शिबिर अंतर्गत हे मोफत प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मनसे महिला सेना रोहा तालुका अध्यक्षा दीपश्री गुरव घासे व रेणुका फाउंडेशनच्या टीमचा  प्रमुख पुढाकार होता. तसेच या शिबिरासाठी मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, नागोठणे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जगदीश वाघमारे यांचे विशेष सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!