E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifक्रीडाखेलधार्मिकमनोरंजनमहाराष्ट्रयुवाराजकारणराजनीतिराज्यलोकल न्यूज़

जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी विजेता

दहीहंडी उत्सवात सुमारे २५ गोविंदा पथकांचा समावेश

किशोर जैन मित्र मंडळाच्या दहीहंडीचा
जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी विजेता

दहीहंडी उत्सवात सुमारे २५ गोविंदा पथकांचा समावेश

नागोठणे | महेश पवार

किशोरशेठ जैन मित्र मंडळ यांच्या वतीने नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकात संपन्न झालेल्या भव्य दिव्य अशा १६ व्या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथकाला मिळाल्याने या गोविंदा पथकाने आपला आनंदोत्सव साजरा केला. या दहीहंडी उत्सवात सात थरांची सलामी देणाऱ्या आमडोशी येथील जय हनुमान गोविंदा पथकाला पथकाला रुपये ५५ हजार ५५५ चे रोख पारितोषिक आणि गदा असलेला आकर्षक चषक देण्यात आला. या दहीहंडी उत्सवात सुमारे २५ गोविंदा पथक सहभागी झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोरशेठ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते, नरेंद्रशेठ जैन, भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि रविंद्र पारखे, राष्ट्रवादीचे नागोठणे विभाग अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहराध्यक्ष बाळासाहेब टके, संजय भोसले, प्रकाशशेठ जैन, संजय महाडिक, हरेश टके, संजय काकडे, मंगेश तेरडे, अतुल काळे, राजू टेमकर, दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. रमेश जाधव, कार्यवाहक जितेंद्र जाधव, धनंजय जगताप, प्रकाश कांबळे, मनोज टके, सुरेश गिजे, खजिनदार घनश्याम ताडकर आदींसह उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

किशोर जैन मित्र मंडळाच्या या दहीहंडी उत्सवात एकूण १७ गोविंदा पथकांनी पाच थरांची सलामी दिली. या  गोविंदा पथकांना प्रत्येकी २ हजार ५२५ रुपयाचे पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. तसेच चार थर लावणाऱ्या तीन महिला गोविंदा पथकांनाही सलामीचे रोख  पारितोषिक देण्यात आले. तर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेले  नागोठणे विभागातील सलामी देणारे श्री जोगेश्वरी नगर गोविंदा पथक, श्री चौंडेश्वरी माता गोविंदा पथक वरवठणे, जय हनुमान गोविंदा पथक आमडोशी, श्री बापदेव गोविंदा पथक वणी व श्री जाखमाता नवतरुण गोविंदा पथक वेलशेत यांना रोख पारितोषिक व चषक देण्यात आला.

संपूर्ण दहीहंडी सोहळ्या दरम्यान अलिबाग येथील गायक महेश पाटील, शलाका पंडित, फनी गेम फेम विनोद नाईक यांनी आपल्या कलेतून उपस्थितांचे मनोरंजन केले. तसेच पाली येथील ओम साई डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी अनेक सदाबहार समूह नृत्य व स्थानिक बाल कलाकारांनी वैयक्तिक नृत्य सादर करून दहीहंडी उत्सवात रंगत आणली. यावेळी छ. शिवाजी महाराज चौक परिसरात नागोठणे पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन दहीहंडी उत्सव समितीचे कार्यवाहक प्रकाश कांबळे यांनी केले.

आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे किशोरशेठ जैन यांनी केले अभिनंदन ! 
आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला २५ हजार रुपयांचे बक्षीस :- 
पाली येथील मानाच्या दोन दहीहंड्या आठ थर लावून फोडून नागोठण्यात परतलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे किशोर जैन मित्र मंडळ दहीहंडी सोहळ्याच्या ठिकाणी रात्री आगमन झाले. यावेळी किशोरशेठ जैन यांनी पुरस्कृत केलेल्या आई जोगेश्वरी गोविंदा पथकाचे त्यांनी भरभरून अभिनंदन केले.  यावेळी आई जोगेश्वरी गोविंदा पथकातील गोविंदांनी किशोरशेठ जैन यांना उचलून घेतले. त्यावेळी किशोरशेठ जैन यांनी पाली येथील विजयी चषक हातात घेऊन डीजेच्या  तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी किशोरशेठ जैन यांनी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!