E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifनिधनमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

संगीता पवार यांचे निधन

पवार कुटुंबीयांवर शोककळा : सर्वत्र हळहळ व्यक्त 

नागोठणे मराठा आळीतील संगीता पवार यांचे निधन

पवार कुटुंबीयांवर शोककळा : सर्वत्र हळहळ व्यक्त 
नागोठणे | महेश पवार
नागोठणे शहरातील मराठा आळी भागातील रहिवासी तसेच आळीतील महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ सौ. संगिता जयराम पवार (वय ७४) यांचे गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून संगीता पवार यांच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना त्यांचा मुलगा अजित याने ठाणे येथील त्याच्या निवासस्थानी आणले होते. मात्र बुधवारी रात्री त्यांची प्रकृती  अचानक खालावली व सकाळी रुग्णालयात नेण्यापूर्वीच संगीता पवार यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या अग्रवाल विद्यामंदिरचे  सेवानिवृत्त वरिष्ठ लेखनिक, कोएसो प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,  के.एम.जी.विभागातील ग्रामस्थ व जेष्ठ समाजसेवक जयराम मारुती पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे अजित व अमित, मुलगी अंजली, सुना, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत संगीता पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारीच दुपारी केएमजी विभाग वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवार कुटुंबीयांचे आप्तेष्ट, सगेसोयरे, नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागोठणे व केएमजी विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत संगीता पवार यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक १२  सप्टेंबर रोजी कुंभारआळी येथील तलावाजवळ  तर उत्तरकार्य रविवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. 
दिवंगत संगीता पवार यांचा मराठा आळीतील विविध धार्मिक, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असायचा. त्याकाळी चालविण्यात येणाऱ्या प्रौढ शिक्षण वर्ग  कार्यक्रमात प्रौढ महिलांना शिक्षण देण्याचे बहुमोल काम त्यांनी केले होते. सन १९९२ ते १९९७ या कार्यकाळात त्यांनी केएमजी विभागाचे प्रतिनिधित्व करताना नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले होते. अशाप्रकारे सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या संगीता पवार यांच्या अचानक झालेल्या  निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!