Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराजकारणराज्यलोकल न्यूज़

कोंडगाव येथे राजिप सदस्य सुमितदादा काते यांचा भव्य सत्कार 

शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी कोंडगाव दणालले

कोंडगाव येथे राजिप सदस्य सुमितदादा काते यांचा भव्य सत्कार 

शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी कोंडगाव दणालले 
नागोठणे : महेश पवार 
रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे गटाचे नवनिर्वाचित सदस्य व शिवसेनेचे युवा नेतृत्व सुमितदादा काते यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन नागोठण्याजवळील कोंडगाव येथे शिवसेना ज्येष्ठ नेते कृष्णा धामणे यांच्या निवासस्थानी गुरुवारी(दि.१२) सायंकाळी करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्यात राजिपच्या नागोठणे गटाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारे व किंगमेकर ठरलेले शिवसेना रोहा उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर यांचाही यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी कोंडगाव दणाणून गेले. या सत्कार सोहळ्यापूर्वी सुमितदादा काते व मनोजदादा खांडेकर यांनी कोंडगाव मधील श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
या भव्य सत्कार सोहळ्याला शिवसेना ज्येष्ठ नेते
कृष्णाजी धामणे, विजय धामणे, शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, विभाग संघटक दिनेश घाग, नागोठणे शहर प्रमुख संतोष चितळकर, उबाठा नेते लहू तेलंगे, गणपत म्हात्रे, संजय पिंपळे, प्रकाश धामणे, सुधागड पंचायत समितीच्या माजी सभापती दीपालीताई बेलोसे, नथुराम बेलोसे,
राजू धामणे, महादेव विचारे, हरीश धामणे, शेखर धामणे, विनोद धामणे, नवनिर्वाचित शाखा प्रमुख रामचंद्र धामणे, लक्ष्मण राजीवले, परशुराम शिर्के, राजेश विचारे, कांता राजीवले, संजय कनघरे, राज दुर्गावले, विश्वनाथ शिर्के आदींसह शिवसेना कोंडगाव शाखा, कातळावाडी, पायरवाडी, तळईवाडी, आदिवासी वाडी येथील कार्यकर्ते, कोंडगाव ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!