Welcome to रायगडचा बुलंद आवाज   Click to listen highlighted text! Welcome to रायगडचा बुलंद आवाज
E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रराज्यलोकल न्यूज़

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे पुरस्कार जाहीर

यशवंत कांबळे, प्रशांत शेडगे व परेश शिंदे मानकरी  

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचे पुरस्कार जाहीर

यशवंत कांबळे, प्रशांत शेडगे व परेश शिंदे मानकरी  

नागोठणे : रायगड जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जपणारी पत्रकार संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या आणि गेली तेरा वर्षे सातत्याने आपला वर्धापन दिन दरवर्षी  नित्यनियमाने साजरा करून नागोठणे शहर व ग्रामीण विभागात नावलौकिक मिळविलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा चौदावा वर्धापन दिन सोहळा लवकरच साजरा होत असून पत्रकार असोसिशनकडून देण्यात येणारे विविध पत्रकार पुरस्कार पत्रकार असोसिएशनच्या मंगळवारी (दि.१७) संपन्न झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले आहेत.

नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा मानाचा पुरस्कार समजला जाणारा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार दैनिक रत्नागिरी टाइम्सचे दापोली प्रतिनिधी म्हणून सुमारे २० वर्षे कार्यरत असलेले श्री यशवंत बापू कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर दैनिक पुण्यनगरीचे पनवेल प्रतिनिधी प्रशांत किसन शेडगे यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तसेच दैनिक सागरचे माणगाव प्रतिनिधी व कार्यालय प्रमुख असलेले परेश दत्तात्रेय शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

याच बैठकीत नागोठणे शहर व ग्रामीण विभागासह जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.या कार्यक्रमाची जय्यत तयारी पत्रकार असोसिएशनकडून करण्यात आली असून यासंदर्भातही संघटनेच्या बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

नागोठणे ग्रामीण विभाग संघटनेचे मार्गदर्शक भाई टके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीला पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष अॅड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सहसचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, राजेश पिंपळे,  सुनील कोकळे, चेतन टके, सचिन नेरपगार, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!