E-Paperhttps://raigadchabulandaawaj.in/wp-content/uploads/2024/01/jjujuu.gifमहाराष्ट्रयुवाराज्यलोकल न्यूज़शिक्षण
शेठ श्री ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन

शेठ श्री ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये नेव्हल आऊटरीच कार्यक्रमाचे आयोजन
नागोठणे | महेश पवार
शेठ श्री ओटरमल शेषमल परमार कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये नेव्हल आऊटरीच या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन २१ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना इंडियन नेव्ही मधील विविध करिअर संधी, भरती प्रक्रिया, पात्रता निकष व प्रशिक्षण पद्धती याबाबत या कार्यक्रमात सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी आर डी ओ) येथील शास्त्रज्ञ डी. रणदीर, वरिष्ठ अधिकारी व्ही. के. चव्हाण, प्रशासन कार्यालयातील परमोध कुमार, वरिष्ठ प्रशासन अधिकारी रामचंद्र नाईक तसेच सेक्रेटरी एडवेंचर क्लब गोपाकुमार व्ही. एस. उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील करिअर संधी, संशोधन क्षेत्रातील कार्यपद्धती तसेच साहसी उपक्रमांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन किशोरशेठ जैन व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास रजिस्ट्रार वैभव नांदगावकर, प्राचार्य विशाल पाटील, तसेच प्रा. नीलम पाटील, प्रा. ज्योती पालवे व प्रा. श्वेता गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अन्वी सकपाळ व श्रावणी जाधव यांनी उत्कृष्टरीत्या केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व करिअर निवडीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरला.




