Uncategorized

स्वच्छ अभियानातील उत्कृष्ठ कामाबद्दल नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांचा गौरव

हा सत्कार केवळ माझ्या एकटीचा नसून माझ्या संपूर्ण सफाई कर्मचारी वर्गाचा : सुप्रियाताई संजय महाडिक 

स्वच्छ अभियानातील उत्कृष्ठ कामाबद्दल नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांचा गौरव

राजिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान 
हा सत्कार केवळ माझ्या एकटीचा नसून माझ्या संपूर्ण सफाई कर्मचारी वर्गाचा : सुप्रियाताई महाडिक 
नागोठणे | महेश पवार
रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांसमवेत  समवेत “कॉफी विथ विनर” या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि.११) अलिबाग येथे करण्यात आले होते.  यामध्ये स्वच्छतेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच व महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले, रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आला. याच कार्यक्रमात नागोठणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. सुप्रियाताई संजय महाडिक यांना रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत असल्या बद्दल एक महिला सरपंच म्हणून म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महिला सफाई कर्मचारी लता वाघमारे यादेखील त्यांच्या समवेत होत्या.  
हा सत्कार केवळ माझ्या एकटीचा नसून माझ्या संपूर्ण सफाई कर्मचारी वर्गाचा आहे अशी भावना यावेळी सरपंच सुप्रियाताई  संजय महाडिक यांनी या  कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.  नागोठणे ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या प्लास्टिक बंदी व प्लास्टिक चे विलगीकरण याबाबत सुरु केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले यांच्याकडून प्रशस्ती पत्र देऊन नागोठण्याच्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच सुप्रियाताई महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. स्वच्छ गाव,  स्वच्छ पर्यावरण, समृद्ध भारत या अभियानात नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे. 
नागोठण्याच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांना देण्यात आलेल्या प्रशस्ती पत्रात म्हटले आहे की, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आपला हा सन्मान करण्यात येत असून
स्वच्छता हा सुसंस्कृत जीवनाचा अविभाज्य घटक आहे. स्वच्छतेच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत हद्दीतील घर, परिसर स्वच्छ सुंदर ठेवून नागरिकांचे आरोग्य मान व जीवनमान उंचावण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. स्वच्छता ही सतत चालणारी प्रक्रिया असल्याने स्वच्छतेत सातत्य ठेवून भविष्यातही आपले गाव प्लास्टिक मुक्त, पर्यावरण युक्त, आदर्श स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटीबद्ध राहाल ही अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!